• Download App
    आमने-सामने: एनी आंसर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ? राहुल गांधीचा वार ; ऑलरेडी देअर इज अॅन आंसर ! स्मृती इराणींनी परतवला।Face to face: 'Any answers Government of India?' Rahul Gandhi's attack; Allready there is an answer! Smriti Irani returned

    आमने-सामने: एनी आंसर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ? राहुल गांधीचा वार ; ऑलरेडी देअर इज अ‍ॅन आंसर ! स्मृती इराणींनी परतवला

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताला परदेशातून मोठ्या प्रमाणात कोरोनापासून बचाव करण्यासाठी मदत मिळत आहे. या मदतीमध्ये राजकारण होताना दिसत असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली . त्यांनी केंद्राला परदेशातून मिळणाऱ्या मदतीबाबत विचारणा केली.

    ज्याचे उत्तर केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी दिले आहे.आपल्या उत्तरात संपूर्ण तपशील जोडत त्यांनी राहुल गांधी यांना राजकारणाच्या पलीकडे विचार करण्याचा सल्ला देखील दिला आहे .

    गुरुवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्वीट केले की,मिस्टर राहुल गांधी, राजकारणापेक्षा वरती उठण्याची वेळ आली आहे. ३१ राज्यातील ३८ संस्थांना केलेल्या वितरणाची माहिती सार्वजनिक व्यासपीठावर आपल्या ट्विटच्या आधीच उपलब्ध आहे. आपल्या म्हणण्यानुसार,आपल्याला सत्याची काळजी असल्यास, कृपया ही माहिती सामायिक करा.

    स्मृती इराणी यांनी आपल्या यासह सरकारचे एक प्रसिद्धी पत्रकही शेअर केले असून,यात विदेशातून आलेली मदत सामग्री कोणत्या राज्यातील कोणत्या हॉस्पिटलला पाठविण्यात आली आहे याची माहिती देण्यात आली आहे. हे पत्रक ४ मे रोजीचे आहे.  राहुल गांधींच्या ट्विटला स्मृति इराणींनी ५ मे रोजी उत्तर दिले.

    राहुल गांधीचे ट्विट

    भारताला आतापर्यंत किती परदेशी मदत मिळाली? मिळालेल्या सेवा कोठे आहेत?
    परदेशातून मिळालेल्या मेडिकल साहित्यांचा फायदा कोण घेत आहे? साहित्यांची राज्यनिहाय विभागणी कश्याप्रकारे करण्यात आली? जर हे केले असेल तर यात पारर्शकता का दिसून येत नाही? याचे मोदी सरकारकडे उत्तर आहे का?

    काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी देशातील कोरोना स्थितीबद्दल सरकारवर निशाणा साधला होता. मोदी सरकार लोकांना लस आणि नोकऱ्या पुरविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप राहुल गांधींना केला.त्यांच्या या आरोपांचे खंडन करत स्मृति इराणी यांनी केंद्राच्या कार्याचे तपशील राहुल गांधीना देत त्यांची बोलती बंद केली आहे.

    Face to face : ‘Any answers Government of India?’ Rahul Gandhi’s attack; Allready there is an answer! Smriti Irani returned

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!