प्रतिनिधी
मुंबई : यंदाच्या नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.Exemption for use of loudspeakers till 12 midnight during Navratri festival also on October 1; Decision of extended day after discussion of Chief Minister, Deputy Chief Minister
पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये एकूण १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून १३ दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच, २ दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.
यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर, २०२२ रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी सोमवार, ३ ऑक्टोबर आणि मंगळवार, ४ ऑक्टोबर या व्यतिरिक्त शनिवार, १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.
Exemption for use of loudspeakers till 12 midnight during Navratri festival also on October 1; Decision of extended day after discussion of Chief Minister, Deputy Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- अतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही
- PFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई
- पीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”!!
- द फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी? एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी? काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर…
- शिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे!!; अर्थ घ्या समजवून!!