विशेष प्रतिनिधी
मुंबई : धनंजय मुंडे यांच्या नावावर मुंबई येथील गिरगांव भागात एक आलिशान फ्लॅट असल्याचं समोर आलंय. ही बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबईत त्यांच्या नावावर अजून ३ ते ४ फ्लॅट असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. Dhananjay Munde
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालानुसार सध्या धनंजय मुंडे यांची एकूण संपत्ती तब्बल ५३.८० कोटी रुपये इतकी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत ५ वर्षात चक्क ३०.८० कोटी रुपयांनी वाढ झालेली दिसते. २०१९ साली धनंजय मुंडे यांची एकूण संपत्ती २३ कोटी इतकी होती.
मुंडेंच्या नावावर १५ कोटी रुपयांची वाहनं!
धनंजय मुंडे यांच्या एकूण ५३.८० कोटी संपत्तीमध्ये तब्बल १५ कोटींच्या वाहनांचा समावेश आहे. त्यांच्या नावावर १५ कोटी ५५ लाख ५ हजार १०५ रुपयांची विविध वाहनं आहेत. ज्यामध्ये टोयोटा इनोव्हा कार, मर्सिडीज बेंझ जीएलएस ४००, महिंद्रा स्कॉर्पिओ कार, टाटा मोटर्स हेक्सा, एक बुलेट, २ टाटा टर्बो ट्रकचा समावेश आहे. Dhananjay Munde
मुंडेंच्या नावावर लाखोंचे सोने
मुंडे यांच्या नावावर केवळ जमिनी किंवा वाहनच नाहीत तर लाखो रुपयांचं सोनं देखील आहे. मुंडे यांच्या नावावर ७ लाख ३ हजार रुपये किमतीचे एकूण १९० ग्रॅम सोने आहे, ज्याची किंमत सध्याच्या बाजार भावानुसार १९ लाख २५ हजार ४६० रुपये इतकी आहे. त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावावर एकूण ६२० ग्रॅम इतके सोने आहे. ज्याची सध्याची किंमत ही ६२ लाख ८३ हजार इतकी आहे. राजश्री मुंडे यांच्या नावावर तब्बल दीड किलो चांदी आहे. ज्याची एकूण किंमत ही सध्याच्या बाजारभावाप्रमाणे १७ लाख ५५ हजार इतकी आहे.
कोटींच्या जमिनीचे मालक आहेत धनंजय मुंडे
धनंजय मुंडेंच्या नावावर एकूण १ कोटी ८६ लाख रुपयांची शेत जमीन आहे. ज्यातील काही जमीन ही परळी मधील वेगवेगळ्या भागात आहे तर, काही जमीन ही मुळशी भागात देखील आहे. मुंडेंच्या नावावर २ बिगर शेतजमीनी आहे ज्यांची एकूण किंमत ही ७ कोटी आहे. त्यातील एका जमिनीचे क्षेत्रफळ हे ४० हजार ८१० चौरस फूट इतके आहे. तर दुसर्या जमिनीचे क्षेत्रफळ हे ६ लाख ७४ हजार ८९७ चौरस फूट इतके आहे. या दोन्ही जमिनी परळी तालुक्यातील जलालपूर गावात आहेत. Dhananjay Munde
मुंडेंच्या मुंबईमधील ‘त्या’ घराची किंमत १० कोटीच्याही पुढे
निवडणूक आयोगाकडील प्रतिज्ञा पत्रानुसार मुंडे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एकूण ५ घरं आहेत. ज्यातील २ घरं जलालपूर या परळी तालुक्यात स्थित असणाऱ्या गावात आहेत. तर आणखी २ घरं ही पुण्यातील शिवाजीनगर भागात आहेत. मुंडेंच्या नावावर असलेलं उरलेलं एक घर हे मुंबईतील मलबार हिल या भागात आहे. या घराचे एकूण क्षेत्रफळ हे २ हजार १५१ चौरस फूट इतके आहे. मुंडे यांच्या मुंबईतील या घराची किंमत ही तब्बल साडे दहा कोटी इतकी आहे.
या आधीही मुंडेंना तब्बल ५७ लाखांचा दंड झाला होता?
मुंडे यांच्या २०१६ मधील प्रतिज्ञा पत्रानुसार, या आधीही मुंडेंनी सेवाकर खात्याने लावलेला दंड व व्याज भरला नसल्याच समजत. एकूण ५७ लाख २४ हजार भरण्याची सूचना सेवाकर खात्याने मुंडेंना दिली होती. मात्र ही दंड आकारणी मान्य नसल्याच सांगून मुंडेंनी या विरोधात उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे कलम २२६, २२७ अन्वये फौजदारी याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. Dhananjay Munde
करुणा शर्मा यांनी केलेल्या दाव्यानुसार जर मुंडेंकडे मुंबईत ४ फ्लॅट आहेत तर ते शासकीय बंगला का सोडत नाहीत? त्यांच्यावर अद्यापही शासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई का केली जात नाहीये? याआधी बाकी असलेल्या दंडाप्रमाणेच मुंडे हाही दंड भरणार नाहीत का?
Exactly how many houses does Dhananjay Munde own ?
- महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांनी पाजळली “राजकीय “विद्वत्ता”; 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करायची केली सूचना!!
- Semiconductor : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; सरकार 4,594 कोटी रुपये गुंतवणार
- Asim Munir : माजी अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले- असीम मुनीर सूट घालणारा लादेन; पाक लष्करप्रमुखांनी दिली होती अणुहल्ल्याची धमकी
- India China : पुढील महिन्यापासून भारत-चीनदरम्यान थेट विमानसेवा; अहवालात दावा- भारताने विमान कंपन्यांना तयारी करण्यास सांगितले