नाशिक : महाराष्ट्र ओल्या दुष्काळात बुडाला तरी राजकारण सुटत नाही; दमबाजी करण्याची हौस काही भागत नाही!!, असं म्हणायची वेळ सध्याच्या विरोधकांच्या राजकीय वर्तणुकीमुळे आली. सगळ्या महाराष्ट्रात शारदीय नवरात्रात पावसाने धुमाकूळ घातला तो अजून घालणार आहे. महाराष्ट्र ओल्या दुष्काळात बुडालाय तरी नेत्यांचे राजकारण सुटले नाही. मदतीच्या किटवर फोटो छापणे थांबले नाही पण त्यापलीकडे जाऊन दमबाजी करण्याचे हौस काही भागली नाही. अशी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची वर्तणूक दिसली. Maharashtra
पवार आणि ठाकरे घरात
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या ओल्या दुष्काळाविषयी चिंता व्यक्त केली. त्यांनी मदतीचे भरमसाठ आकडे मागितले. पण दोघेही ओला दुष्काळ पाहायला घराबाहेर पडले नाहीत.
शिंदे + सरनाईकांचे किट वर फोटो
त्या उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाचे मंत्री ओला दुष्काळ बघायला नुकसानीची पाहणी करायला मंत्रालयाच्या बाहेर पडले. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पण ते जाताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी नसत्या गोष्टी केल्या. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो छापले. त्यामुळे लोक त्यांच्यावर रागावले तुमची मदत नको ती परत घेऊन जा, असे लोक म्हणाल्या च्या बातम्या माध्यमांनी दिल्या. त्यामुळे विरोधकांना टीकास्त्र सोडायची आयती संधी मिळाली. एकनाथ शिंदे यांनी फोटोवर लक्ष देऊ नका किटमधल्या मदतीवर लक्ष द्या, असे विरोधकांना सुनावले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एकनाथ शिंदेंची बाजू सावरून घ्यावी लागली. पण शेतकऱ्यांच्या मदतीच्या गेटवर फोटो छापून शिवसेनेच्या मंत्र्यांनी अनावश्यक वाढावा केला, ही वस्तुस्थिती मात्र लपून राहिली नाही.
रोहित पवारांची नेहमीची बडबड
नेहमीप्रमाणे शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांची बडबड सुरूच राहिली. त्यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यातली राजकीय भोके शोधली. प्रत्यक्षात नुकसान किती झाले सरकारने मदत किती जाहीर केली ते कशा पद्धतीने मिळणार आहे?, याविषयी रोहित पवार काही बोलले नाहीत, पण मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही वगैरे दमबाजी मात्र करायला ते विसरले नाहीत.
मनोज जरांगे यांची दमबाजी
जी फडफड रोहित पवारांनी केली, तशीच बडबड मनोज जरांगे यांनी केली. शेतकऱ्यांना 50 टक्के – 60 टक्के असली कुठली नुकसान भरपाई देऊ नका. शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले, तेवढी सगळी नुकसान भरपाई द्या, नाहीतर महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी दमदाटी मनोज जरांगे यांनी केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी ओल्या दुष्काळी भागात जेवढ्या गावांना भेटी दिल्या त्याच्या निम्म्या गावांनाही रोहित पवार किंवा बाकीच्या विरोधकांनी भेटी दिल्या नाहीत. स्वतः उद्धव ठाकरे तर मातोश्री बाहेर सुद्धा पडले नाहीत. शरद पवार जेव्हा घराबाहेर पडले, त्यावेळी त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पुण्यातल्या कात्रज जवळच्या निंबाळकरवाडीत लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि आमची घरे वाचवा अशी पवारांकडे मागणी केली. पवारांनी लोकांचे निवेदन स्वीकारून आश्वासन देण्यात समाधान मानले.
फडणवीसांचे तोंडी आवाहन
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीच्या संकटात राजकारण नको, असे सांगितले. त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला, पण ओला दुष्काळ जाहीर करण्याचा कुठला शब्द दिला नाही. विरोधकांनी राजकारण करू नये एवढेच फक्त ते म्हणत राहिले.
राष्ट्रवादीचे आमदार खासदार पगार
अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आमदारांनी एक महिन्याचा पगार मुख्यमंत्र्यांनी दिला जयश्री जाहीर केले त्यांनी तिथून शेतकऱ्यांना मदत करायची असल्याने आपलाही खारीचा वाटा असावा असे अजित पवारांना वाटले म्हणून त्यांनी बाकीच्या पक्षांच्या आधी स्वतःच्या आमदार खासदारांचे पगार मुख्यमंत्री निधीकडे वळवायचा निर्णय घेतला.
Even though Maharashtra is mired in a wet drought, politics does not end
महत्वाच्या बातम्या
- डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली “शांततेची कड”; पण केली भारत + चीन आणि सगळ्या युरोप वर प्रचंड आगपाखड!!
- Chhattisgarh : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर चकमक, 80 लाखांचे इनाम असलेले 2 नक्षली ठार; मृतदेह आणि AK-47 सह अनेक शस्त्रे जप्त
- ॲमेझॉनच्या गुंतवणुकीतून महाराष्ट्रात डिजिटल क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
- Syria : 58 वर्षांनंतर सीरिया संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होणार; राष्ट्राध्यक्ष अल-शारा न्यूयॉर्कमध्ये पोहोचले