• Download App
    पिंपरीत फडणवीसांच्या कार्यक्रमापूर्वीच भाजप - राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान!!|Even before the program of Fadnavis in Pimpri, there was a great commotion among BJP-NCP workers

    पिंपरीत फडणवीसांच्या कार्यक्रमापूर्वीच भाजप – राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान!!

    प्रतिनिधी

    पिंपरी: चिंचवड शहरातील शाहूनगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान उद्घाटन प्रसंगी सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला काढले.Even before the program of Fadnavis in Pimpri, there was a great commotion among BJP-NCP workers

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाहूनगर परिसरात महापालिकेने 14 कोटी खर्च करुन भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान तयार केले आहे. या उद्यानामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. आज संध्याकाळी या उद्यानाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.



    या उद्घाटन सोहळ्यास काही वेळ शिल्लक असताना या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. ‘चोर हे चोर हे, बीजेपी चोर हे’ आदी घोषणा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

    Even before the program of Fadnavis in Pimpri, there was a great commotion among BJP-NCP workers

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा