विशेष प्रतिनिधी
मुंबई : २०१९ मध्ये साताऱ्यात पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या वर जाता आले नाही. ही ५४ ची संख्या टिकवून ठेवण्यासाठी वारंवार आमदारांना विश्वास द्यावा लागतोय. घाबरु नका, काळजी करु नका, असे त्यांना सांगावे लागतयं. मात्र तुमच्या हातात काही नाही,Even after getting wet in the rain, you could not go beyond 54, Gopichand Padalkar’s criticism on Sharad Pawar
अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केली.आगामी २०२४ मध्ये महाराष्ट्रात स्वबळावर भाजपचे सरकार येईल, असा विश्वास भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.
त्यास उत्तर देताना पवार म्हणाले, भाजपला सत्तेत येऊ देणार नाही. पवारांच्या या वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, २० वर्षांमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही. त्यांनी भाजपची चिंता करु नय. २०१९ साली विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली.
फडणवीसांना महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्रीपदावर पुन्हा बसवण्यासाठी भाजप १०६ आणि शिवसेनेचे ५५ आमदार असे एकूण १६१ आमदार निवडून दिले. मात्र तुम्ही विश्वासघात करुन सत्तेत आला. राज्यातील जनता भारतीय पक्षाबरोबर आहे. त्यामुळे तुम्ही कितीही संघर्ष केला, २०१९ मध्ये साताऱ्यात पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या वर जाता आले नाही.
Even after getting wet in the rain, you could not go beyond 54, Gopichand Padalkar’s criticism on Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- अमेठीत होळीच्या मारामारीत आठ जण जखमी दोघे मृत; दोन गंभीर जखमीं
- Congress Debacle : “आप” – तृणमूलची ज्युनिअर पार्टनर व्हायला काँग्रेस तयार; पी चिदंबरम यांची “ऑफर
- औरंगाबादचा मटका किंग आबेद पठाणचा नाना पटोले यांच्या हजेरीत काँग्रेसमध्ये प्रवेश!!
- Kolhapur Byelection