राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचा दावा करतानाच राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. त्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. एका बाजुला दुकाने बंद आणि दुसरी ई-कॉमर्स कंपन्यांकडून सर्रास विक्री सुरू आहे. या प्रश्नावर सरकारने तत्काळ तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे. Elgar of traders against Thackeray government, anger over increase in lockdown
प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचा दावा करतानाच राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. त्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. एका बाजुला दुकाने बंद आणि दुसरी ई-कॉमर्स कंपन्यांकडून सर्रास विक्री सुरू आहे. या प्रश्नावर सरकारने तत्काळ तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे.
राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय दुदैर्वी असल्याचे म्हणत व्यापारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईसारख्या महानगरात रुग्णसंख्या कमी होत असतानाही निबंर्धांमध्ये सवलत देण्याचा विचार करण्यात आला नाही.
असंघटित व्यापाराचा विचार केल्यास ४ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत ७० हजार कोटींचा व्यवसाय बुडणार आहे. सामान्य व्यापाºयांना राज्य सरकारकडून कोणतेच अनुदान, करमाफी अथवा सवलत देण्यात आलेली नाही. त्यामुळे या व्यापाऱ्यांचे जगणे अवघड झाल्याचे शहा यांनी म्हटले आहे
पारंपरिक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली असताना, ई – कॉमर्स कंपन्या मात्र सर्रास नियमांचे उल्लंघन करून विक्री करत आहेत. नियम हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. व्यापारी संघटना याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे शहा यांनी सांगितले.
Elgar of traders against Thackeray government, anger over increase in lockdown
महत्त्वाच्या बातम्या
- कैद्यापाठोपाठ आता आंध्रातील नक्षलवाद्यांनाही कोरोनाची लागण, शरण येण्याचे आवाहन
- भारतात धार्मिक व राजकीय कार्यक्रमांतून कोरोनाचा फैलाव, ‘डब्लूएचओ’च्या अहवालात टीका
- जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट, आरोग्य यंत्रणा उध्वस्त नागरिकांचा घरातच होतोय मृत्यू
- सिरमने कोविशिल्डच्या दोन लशींमधील अंतर वाढवले, आता १२ ते १६ आठवड्यांनी घ्या दुसरा डोस
- लस, ऑक्सिजनप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले गायब, राहुल गांधी यांची टीका
- आठवडाभरात रशियाची स्पुटनिक लस भारतीयांना मिळणारल लसीकरणाला येणार वेग