• Download App
    वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी सवलती ठाकरे - पवार सरकारने जाहीर केल्या नाहीत ; - विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांची टीका Electricity bill, property tax, GST concessions Thackeray - Pawar government did not announce; - Criticism of Opposition Leader Shri Devendra

    वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी सवलती ठाकरे – पवार सरकारने जाहीर केल्या नाहीत ; – विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

    प्रतिनिधी

    मुंबई : लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Electricity bill, property tax, GST concessions Thackeray – Pawar government did not announce; – Criticism of Opposition Leader Shri Devendra

    – फडणवीस म्हणतात…

    कोविड प्रतिबंधासाठी जो 3300 कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे.

    मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला. पण, बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायी, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या.



    वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण, तसे झालेले दिसत नाही. हे निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे.

    Electricity bill, property tax, GST concessions Thackeray – Pawar government did not announce; – Criticism of Opposition Leader Shri Devendra

    Related posts

    सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते विकासाचे महत्त्वपूर्ण नियोजन; नाशिककडे येणाऱ्या “या” रस्त्यांच्या सक्षमीकरणावर भर!!

    Ashish Shelar : ठाकरेंच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; उबाठा सेनेची अवस्था जीर्ण, मंत्री शेलार यांचे टीकास्त्र

    Eknath Khadse : पूर्वीची भाजप भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त होती; सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या बडगुजरलाही घेतले, खडसेंची टीका