• Download App
    विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक, महाविकास आघाडीची लागणार कसोटीElections for six seats in the Legislative Council will be held on December 10

    विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक, महाविकास आघाडीची लागणार कसोटी

    स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्रित लढतात का, याबाबत उत्सुकता असेल. शिवसेना आणि कॉँग्रेस प्रत्येकी दोन जागा लढत असल्याने राष्ट्र्रवादी कॉँग्रेस मदत करणार का? हा प्रश्न असल्याने महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे.  Elections for six seats in the Legislative Council will be held on December 10


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्रित लढतात का, याबाबत उत्सुकता असेल. शिवसेना आणि कॉँग्रेस प्रत्येकी दोन जागा लढत असल्याने राष्ट्र्रवादी कॉँग्रेस मदत करणार का? हा प्रश्न असल्याने महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे.

    मुंबईतील दोन तसेच कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि नागपूर या सहा जागांसाठी ही निवडणूक होईल. मुंबईत शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप, कोल्हापुरात काँग्रेसचे आमदार आणि विद्यमान राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचे अमरिश पटेल, अकोला-बुलडाणा-वाशिममध्ये शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया, नागपुरात भाजपचे गिरीश व्यास यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतींचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती हे या निवडणुकीत मतदार असतात.

    सध्या भाजपकडे नागपूर आणि धुळे-नंदूरबार अशा दोन जागा आहेत. शिवसेनेकडे अकोल्याची आणि मुंबईची जागा आहे. कॉँग्रेसकडे मुंबई आणि कोल्हापूरची जागा आहे. शिवसेनेकडून रामदास कदम यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार का? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत प्रथमच शिवसेनेची कसोटी लागणार आहे.
    निवडणुकीची अधिसूचना १६ नोव्हेंबर रोजी निघणार आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. २४ नोव्हेंबरला छाननी तर २६ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून १४ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

    Elections for six seats in the Legislative Council will be held on December 10

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची मराठी माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!!

    Malegaon sugar factory election result 2025 अजितदादांना नको असलेले चंद्रराव तावरे विजयी; माळेगावच्या कारखान्यात चालणार नाही मनमानी!!

    Jio Adani Partnership : जिओ पंपांवर मिळेल अदानींची CNG; अदानी गॅस स्टेशनवर जिओच्या पेट्रोल-डिझेलची विक्री, ATGL-रिलायन्स BPची भागीदारी