प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठका रद्द करून ज्योतिषाला हात (भविष्य) दाखवण्यासाठी गेले. आत्मविश्वास नसल्यामुळे ज्योतिषाला हात दाखवायला लागतो, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला होता. मात्र, ज्यांना कुणाला दाखवायचा त्यांना मी 30 जूनलाच “हात दाखवला” आहे, असे सडेतोड प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. Eknath Shinde’s reply to Pawar – Thackeray
एकनाथ शिंदे म्हणाले, मी शिर्डीला गेलो तेव्हा दोन मंत्री, अधिकारी आणि मीडिया सोबत होतो. आम्ही सगळे काही उघडपणे करतो. यांच्यासारखे लपूनछपून करीत नाही. हात दाखवायचे म्हणाल, तर आम्ही 30 जूनलाच ज्यांना दाखवायचा त्यांना हात दाखवला आहे. त्यामुळे त्यांनी त्यावर आम्हाला शिकवू नये असा प्रतिटोला एकनाथ शिंदे यांनी पवार – ठाकरे यांना लगावला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे या राज्यात त्यांचा अवमान कोणीही सहन करणार नाही. पण गेल्या काही दिवसांपासून जे सुरू आहे, ते महाराष्ट्राला शोभणारे नाही. आम्ही दिवसरात्र काम करीत आहोत, ते पाहून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळेच असे प्रकार सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Eknath Shinde : अग बाई अरेच्या!!; “मनातले मुख्यमंत्री” की मनातले मांडे??
तेव्हा मी ४० दिवस तुरुंगात होतो
कर्नाटकचा विषय हा 2012 चा आहे. इतक्या वर्षांत तुम्ही या सीमाप्रश्नी काय निर्णय घेतला? हा एकनाथ शिंदे स्वतः 40 दिवस तुरुंगात गेला. आम्ही सीमावर्ती भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करत आहोत. महाराष्ट्राचा एक इंचही तुकडा कुठेही जाणार नाही. ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
Eknath Shinde’s reply to Pawar – Thackeray
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये पंपूर मधल्या शिव मंदिराचा होणार जीर्णोद्धार; अतिक्रमण हटवण्याचे महापौर याकूब मलिकांचे निर्देश
- ठाकरे – आंबेडकर – पवार एकत्र येण्याच्या नुसत्याच चर्चा, पण दलित पॅंथरचा एकनाथ शिंदेंना खुला पाठिंबा
- ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून बिस्मिल्ला ए रहमान ए रहीम म्हणत सुषमा अंधारेंनी समजावले इस्लामचे 5 फर्ज!