आरक्षणाच्या मुद्य्यावरून सध्या राज्यभरातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील तीन दिवसात तीन मराठा तरूणांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना मराठा समाजाच्या आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका मांडत, मराठा समाजातील तरूणांना कळकळीची विनंतीही केली आहे. Eknath Shindes reaction to the suicide of Maratha community youth for reservation
पत्रकारपरिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, ” मराठा समाजाच्या मुलाने आत्महत्या करणे हे त्याच्या परिवारासाठी आणि आमच्यासाठीही वेदनादायी आहे. कारण, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रालाच आपला परिवार समजतो. त्यामुळे ज्या आत्महत्या झाल्या आहेत, ते अतिशय दुर्दैवी आहेत. एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी कटीबद्ध आहे.”
याशिवाय ”मराठा समाजातील माझ्या भावानो मी आपल्याला आवाहन आणि विनंती करतोय, टोकाचं पाऊल उचलू नका. धीर धरा थोडा वेळ द्या. या सगळ्या गोष्टी होताय आणि होतील. आपल्या कुटुंबाचा मुलाबाळांचा थोडा विचार मराठा समाजातील तरूणांनी केला पाहिजे. सरकार म्हणून मराठा समजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटीबद्ध आहोत. ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी जे जे काही लागेल ते आम्ही नक्की करणार आहोत.” असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं.
आरक्षणाच्या मुद्य्यावरून सध्या राज्यभरातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेटम संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने, निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठीच मराठा समाजातील तरूण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
Eknath Shindes reaction to the suicide of Maratha community youth for reservation
महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या दिशेने; 25 ऑक्टोबर पासूनचा जाहीर केला कार्यक्रम!!
- काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याविरोधात भाजपाची निवडणूक आयुक्तांकडे तक्रार
- शुद्ध मनाच्या संधीचे सोने, 10 % EWS आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ!!
- महुआ मोईत्रा वादापासून TMCने राखले अंतर; म्हटले- जो वादात अडकला, त्यानेच बोलावे; निशिकांत दुबे यांची लोकपालकडे तक्रार