विशेष प्रतिनिधी
नागपूर : संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्षनेते पद मिळवा, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला.
महाराष्ट्रातल्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिकामे असल्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद द्या नाहीतर घटनाबाह्य उपमुख्यमंत्री पद रद्द करा, अशी मागणी करून भाजपच्या ऐवजी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाच घेरले होते.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरातून प्रत्युत्तर दिले. विधानसभेतले विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्याइतपत विरोधकांकडे संख्याबळच नाही. त्यांचे तेवढे आमदारच निवडून आलेले नाहीत. त्यामुळे संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्षनेते पद मिळवा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी हाणला.
– फडणवीसांच्या सुरात शिंदेंचा सूर
पण त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळला. विधानसभेतले विरोधी पक्षनेते पद किंवा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेतेपद देणे हे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या हातात आहे त्यांनी निर्णय घेतला की तो आम्हाला मान्य असेल, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला पण तो देण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणून घेतला होता.
Eknath Shinde’s attack on Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- उपमुख्यमंत्री पद रद्द करा; भाजपवर निशाणा साधताना उद्धव ठाकरेंचे शिंदे + अजितदादांवरच घाव!!
- Pakistan : पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, अरुणाचलवरील चीनच्या दाव्याला दिला पाठिंबा; भारताने दिले प्रत्युत्तर
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- मंदिरातील देणगी ही देवाची मालमत्ता; बँका वाचवण्यासाठी नाही
- समाजाला समानतेकडे नेणारा संविधानाचा प्रकाशपथ; संविधान डिजिटल चित्ररथाचे लोकार्पण