• Download App
    Eknath Shinde एकनाथ शिंदेंची ठाण्यात सर्वपक्षीय दिवाळी; भाजप + मनसेच्या मंचांवर हजेरी!!

    एकनाथ शिंदेंची ठाण्यात सर्वपक्षीय दिवाळी; भाजप + मनसेच्या मंचांवर हजेरी!!

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात स्थानिक भाजपचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याची भाषा करीत असले, तरी एकनाथ शिंदे यांनी मात्र आज ठाण्यात सर्वपक्षीय दिवाळी साजरी केली. त्यांनी शिवसेनेच्या बरोबरच भाजप आणि मनसे नेत्यांनी साजरा केलेल्या दिवाळीच्या मंचावर सुद्धा हजेरी लावली. Eknath Shinde

    शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सौ. मीनाक्षी शिंदे यांनी तर ठाणे जिल्हा युवासेनेच्या वतीने नितीन लांडगे यांनी खास दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना उपस्थित राहून तरुणाईशी संवाद साधला.

    याप्रसंगी समस्त ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच ही दिवाळी आनंदात, उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले. यंदाच्या दिवाळीला मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज देऊन त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही याची दक्षता आपण घेतली असल्याचे यावेळी नमूद केले. तसेच लाडक्या बहिणी लाडके भाऊ सोबत लाडके भाचे आणि भाच्या देखील इथे उपस्थित आहेत, त्या सर्वांनी दिवाळीचा सण उत्साहात साजरा करावा यासाठी शुभेच्छा दिल्या.

    यासोबतच भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय वाघुले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट सोहळ्याला उपस्थित राहून तरुणाईचा उत्साह वाढविला.

    यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मीनाक्षी शिंदे,माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका सौ.नम्रता भोसले जाधव, युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे, टेंभीनाका शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजडे, स्वानंद पवार, रूपेश पाटोळे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Eknath Shinde’s all-party Diwali in Thane

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे + पवारांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सोडले वाऱ्यावर; आले सात आणि आठ वर; महाराष्ट्रातल्या गावांनी ठाकरे आणि पवार ब्रँडची लावली वाट!!

    Chhagan Bhujbal : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा दावा- शरद पवारांनीच भुजबळांना तुरुंगात पाठवले; धनंजय मुंडेंनाही पाठवण्याची होती इच्छा

    महायुतीत भाजपची कुरघोडी, पण शिंदे – अजितदादांच्या पक्षांनीही मारली बाजी!!