विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath shinde महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक होईल, अशा बातम्या काल सायंकाळ पासून बातमी दिल्या होत्या. परंतु माध्यमांचा तो होरा चुकला. फडणवीस दिल्लीमध्ये एका खाजगी विवाह समारंभाला गेले होते. त्यानंतर ते अमित शाहा यांच्याकडे जातील, असे माध्यमांनी बातम्यात नमूद केले होते. त्या सगळ्या बातम्या चुकीच्या ठरल्या. कारण देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात काल रात्री कुठलीही बैठकच झाली नाही. Eknath shinde tweet about mahayuti
याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजुतीची भूमिका घेणारे ट्विट करून आपल्या समर्थक शिवसैनिकांना “वर्षा” बंगल्याभोवती गर्दी न करण्याचे आवाहन केले. त्याचवेळी त्यांनी महायुती अभेद्य असल्यासही निर्वाळा दिला. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी, खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेच हवेत, असा आग्रह भाजप नेतृत्वाकडे करण्याचा प्रयत्न केला. Eknath shinde
अनेकांनी तशी जाहीर वक्तव्य केली. त्यानंतर विशिष्ट वातावरण निर्मिती होत चालली. एकनाथ शिंदेंनी वैद्यकीय मदत दिलेल्या लाभार्थ्यांनी सिद्धिविनायक मंदिरात त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी महाआरती केली. त्यानंतर विविध मंदिरांमध्ये आरत्या झाल्या. अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर चढवण्याची बातमी आली. या सगळ्या घटना घडामोडी मधून एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप नेतृत्वावर मुख्यमंत्रीपदासाठी भाजप नेतृत्वावर दबाव वाढवत असल्याची वातावरण निर्मिती झाली.
पण या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतः एकनाथ शिंदे यांनी मात्र समजुतदार भूमिका घेणारे ट्विट करून शिवसैनिकांच्या भावनांना फुंकर घातली. महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड जनादेश दिला आहे. सरकार देखील महायुतीचेच येणार आहे. ते महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी कार्यरत राहणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने, शिवसैनिकांनी दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. परंतु, शिवसैनिकांनी आणि समर्थकांनी “वर्षा” बंगल्याभोवती येऊन गर्दी करू नये, असे आवाहन शिंदे यांनी ट्विट मधून केले. Eknath shinde
Eknath shinde tweet about mahayuti
महत्वाच्या बातम्या
- Gautam Adani : गौतम अदानी यांचे लाच प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले; याचिकेत सेबीच्या विश्वासार्हतेबद्दल चिंता
- Modi – Shah – RSS एकजुटीच्या निर्णयाचा महायुतीच्या नेत्यांचा निर्वाळा; पण शिंदे + अजितदादांच्या हट्ट किंवा आग्रहाची मोदी – शाहांपुढे चालेल
- India : भारताने 300 अब्ज डॉलरचे क्लायमेट पॅकेज नाकारले; COP29 मध्ये म्हटले- एवढ्याने विकसनशील देशांच्या गरजा पूर्ण होणार नाहीत
- Ajit Pawar अजितदादांची चालबाजी, पवार कुटुंबीयांच्या “गेम”वर राम शिंदे यांचा प्रहार; महायुतीच्या नेत्यांना गंभीर दखल घेण्याचा दिला इशारा!!