महाराष्ट्राच्या नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कष्ट केले, तर काय होते, हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकांमध्ये जे मोठे यश मिळवले, 54 नगराध्यक्ष निवडून आणले, त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना रुजली किंबहुना शिवसैनिक रुजला, हे चित्रच या निमित्ताने समोर आले. Eknath Shinde
वास्तविक एकनाथ शिंदे हे काही ठाकरेंसारखे ब्रँड नाहीत, की पवारांसारखे घराणेशाहीच्या राजकारणातून पुढे आलेले नेते नाहीत. तरी देखील कट्टर कार्यकर्ता काय करू शकतो, याचा “चमत्कार” त्यांनी सलग दोन निवडणुकांमध्ये म्हणजे 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणि 2025 च्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये दाखवून दिले.
एकनाथ शिंदे भाजप सारख्या बलाढ्य पक्षासमोर कमी पडले, यात विशेष काही नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे करिश्माई नेतृत्व आणि भाजपची बळकट संघटना या एकनाथ शिंदे यांच्याकडे जमेच्या बाजू नाहीत. पण एकनाथ शिंदे यांच्याकडे कट्टर शिवसैनिकाची जी लढवय्या वृत्ती आहे, ती भाजप मधल्या कुणाकडे नाही. ठाकरेंकडे ती शिल्लक उरली नाही आणि पवारांकडे ती वृत्ती असायचा प्रश्नच उद्भवत नाही.
– घराणेशाहीचा लाभ अजितदादांना
घराणेशाहीतून उदयाला आलेली स्थानिक नेतृत्व ही पवारांसकट त्यांच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीची फलश्रुती. पण तिचा लाभ खुद्द पवारांच्या ऐवजी अजित पवारांना झाला. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 39 नगराध्यक्ष निवडून आले. याचा अर्थ अजित पवारांनी फक्त त्यांचे बालेकिल्ले राखले त्यापलीकडे कुठले कर्तृत्व ते दाखवू शकले नाहीत.
– एकनाथ शिंदेंचे लढवैय्या नेतृत्व
पण एकनाथ शिंदे यांच्याकडे घराणेशाहीतून आलेले नेतृत्व नव्हते. खुद्द एकनाथ शिंदेंचे नेतृत्व तसे नाही. त्यांचे नेतृत्व कार्यकर्ता म्हणून विकसित झाले आणि तेच भाजपने वापरून ते पुढे नेले. किंबहुना उठाव करणारा कार्यकर्ता आणि काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचे नेतृत्व विकसित झाले. वास्तविक एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने पायाला भिंगरी लावून गेल्या तीन-चार वर्षांमध्ये महाराष्ट्रात फिरले, तेवढे देवेंद्र फडणवीस सुद्धा फिरले नाहीत. शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या एवढे फिरण्याचा प्रश्नच कधी उद्भवला नाही. सुप्रिया सुळे या यादीत तर अजिबात समाविष्ट नाहीत.
– शिंदेंच्या शिवसेनेत ना कोणी मालक, सगळे शिवसैनिक
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले. त्याला भाजपने हवा दिली भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंना सर्व प्रकारचे बळ दिले, हे जरी मान्य केले, तरी एकनाथ शिंदेंनी कार्यकर्ता म्हणून स्वतःचे मोठे नेतृत्व विकसित केले. बाळासाहेबांचा खरा राजकीय आणि वैचारिक वारसा आपल्याकडे आहे, हे सगळ्या महाराष्ट्रात रुजविले. शिवसेनेची मूळची लढवय्या वृत्ती आपल्याकडे आहे आणि ती आपण चालवत असलेल्या शिवसैनिकांमध्ये सुद्धा आहे, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे ते वारंवार भाषणातून हे म्हणत होते, की आमच्या शिवसेनेत मी जरी मुख्य नेता असलो, तरी इथे कोणी मालक नाही आणि कोणी नोकर नाही इथे सगळे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यांच्या या मनोवृत्तीमुळे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनाही मोठे बळ प्राप्त झाले.
– शिवसैनिक स्टाईलने शिंदे सेना एकत्र
भाजपच्या सत्तेचे “फेविकॉल” शिंदेंच्या शिवसेनेला एकत्र ठेवण्यात उपयोगी पडले हे खरे, पण त्याही पलीकडे शिंदेंनी अगदी बाळासाहेब स्टाईलने नव्हे तर शिवसैनिक स्टाईलने शिवसेनेला एकत्रित ठेवले. उदय सामंत यांच्यासारख्या “पवार बुद्धीच्या” नेत्यालाही अंगठ्याखाली ठेवले, हे त्यांचे एकनाथ शिंदेंचे राजकीय कर्तृत्व मान्य करावे लागेल. या कर्तृत्वातूनच एकनाथ शिंदेंना सलग तिसऱ्या निवडणुकीत मोठे यश मिळवता आले.
– घरबशे नेतृत्व नाही चालणार
वास्तविक एकनाथ शिंदे जसे महाराष्ट्रभर फिरले, निवडणुकीचा प्रचार केला, तसे फिरायला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे किंवा सुप्रिया सुळे यांना कोणी प्रतिबंध घातला नव्हता. हे तिन्ही नेते आपापल्या पक्षांसाठी फिरले असते, त्यांनी आपापल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रचार केला असता, तर त्यांना आत्ता मिळाले, त्यापेक्षा जास्त यश निश्चित मिळू शकले असते. पण एकनाथ शिंदे घराबाहेर पडले आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे घरी बसले. याला कोण काय करणार?? महाराष्ट्रात इथून पुढे घरात बसणारे नेतृत्व चालणार नाही. उगाचच वडिलांच्या बळावर निवडून येऊन पोपटपंची करणारे नेतृत्व, तर बिलकुल चालणार नाही. तिथे भाजप सारखी बळकट संघटना आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व किंवा एकनाथ शिंदे यांच्या सारखा चिवट आणि लढवय्या शिवसैनिक यांचे नेतृत्व चालेल. लोक त्यांना चांगला प्रतिसाद देतील, हेच महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांनी दाखवून दिले. याचे जसेच्या तसे पडसाद महापालिका निवडणुकांमध्ये उमटल्यास आश्चर्य वाटायला नको.
Eknath Shinde shown the performance
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत स्वतंत्र, आघाडी इतरत्र; काँग्रेसच्या भूमिकेवरील संशय दूर; ठाकरे बंधूंच्या युतीत पवारांचा खोडा!!
- China Building : बांगलादेशात चीन उभारतोय एअरबेस आणि पाणबुडी तळ; संसदीय समितीचा अहवाल
- शालिनीताई पाटील : काँग्रेसच्या राजकीय वैभवशाली काळाच्या साक्षीदार हरपल्या!!
- पुणे, पिंपरी चिंचवड मधून नेत्यांचा ओघ भाजपकडे सुरू असताना आबा बागुल मात्र शिंदे सेनेत!!