विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde “आम्ही केवळ विधानसभाच नाही, तर राज्यातील 70 नगरपालिका जिंकलो. नकली को किया ढेर, UBT को पता चला कोण असली शेर” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मिळालेल्या यशानंतर ते मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.Eknath Shinde
एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासात कधीही 65 ते 70 नगराध्यक्ष निवडून आले नव्हते, मात्र आज हा विक्रम प्रस्थापित झाला आहे. हा विजय मी महाराष्ट्रातील जनतेला आणि माझ्या लाडक्या बहिणींना समर्पित करतो. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे काहींना सहन झाले नाही. मात्र, अडीच वर्षांच्या कामाची पावती म्हणून जनतेने महायुतीचे 232 आमदार निवडून दिले आणि आता नगरपालिकांमध्येही आम्हालाच कौल दिला आहे.Eknath Shinde
‘लाडकी बहीण’ योजना थांबणार नाही!
आपल्या लाडक्या बहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माझी सर्वात आवडती योजना आहे. अनेक माईच्या लालांनी ही योजना बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही विरोध मोडून काढला. ही योजना आता कोणीही बंद करू शकत नाही. लवकरच या योजनेची रक्कम 2100 रुपये करण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. मुलींना मोफत उच्च शिक्षण आणि आरोग्य सुविधांमुळे जनतेचा महायुतीवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘चांदा ते बांदा’ शिवसेनेची घोडदौड
शिवसेनेच्या विस्तारावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना आता केवळ मुंबई-ठाण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती आज ‘चांदा ते बांदा’ पोहोचली आहे. लोकांना बदल हवा होता आणि तो आम्ही घडवून आणला आहे. महाविकास आघाडीने लावलेली स्थगिती आम्ही दूर केली आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले. आता विधानसभा आणि नगरपालिकांप्रमाणेच आगामी महानगरपालिकांवरही महायुतीचाच भगवा फडकला पाहिजे.
प्रशासकीय आणि विकासकामांवर भर
कल्याण-डोंबिवलीसह राज्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘क्लस्टर’ आणि ‘SRA’ योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. कार्यकर्त्यांना मंत्र देताना ते म्हणाले, मतदार याद्या तपासा आणि एक टीम म्हणून काम करा. जनतेच्या अडीअडचणीत धावून जाणारा कार्यकर्ता हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. जनता मालक असून मी केवळ त्यांचा सेवक आहे. तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठीच मी झटत राहीन.
Eknath Shinde Attack Uddhav Thackeray Maharashtra Local Body Election Victory MIM Corporators Join Photos Videos Report
महत्वाच्या बातम्या
- कार्यकर्त्यांनी कष्ट केले, तर काय होते, हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले!!
- Imran Khan : तोशाखाना प्रकरण- इम्रान, बुशरा बीबीला 17 वर्षांची शिक्षा; ₹16.40 कोटींचा दंडही ठोठावला; माजी पाकिस्तानी PM 28 महिन्यांपासून तुरुंगात
- महाराष्ट्रात भाजपच नंबर 1; 129 नगराध्यक्ष, 3325 नगरसेवक निवडून आणून रेकॉर्ड!!
- देवाभाऊंच्या पक्षाचा वरून पहिला नंबर, तर शरद पवारांच्या पक्षाचा खालून पहिला नंबर; राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सोशल मीडियावर सामसूम!!