• Download App
    Eknath shinde shivsena forms alliance with anand raj ambedkar ठाकरे - आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब;

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Eknath shinde

    नाशिक : 2024 च्या लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोन नेते “अचानक” एकत्र आले होते. त्यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या युतीची घोषणा देखील केली होती. ती माध्यमांच्या पडद्यांवर आणि वर्तमानपत्रांच्या कागदावर उतरली, पण प्रत्यक्षात ती युती कधी झालीच नाही आणि तिचे राजकीय अस्तित्व कधी दिसलेच नाही.Eknath shinde shivsena forms alliance with anand raj ambedkar

    या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी मात्र एकत्र येऊन युतीची घोषणा केली. रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळवण्यासाठी मी एकत्र आलो आहोत कारण आम्ही दोघे कार्यकर्तेच आहोत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना कष्टकऱ्यांसाठी खूप चांगली निर्णय घेतले. ते कायम कष्टकऱ्यांच्या सोबत राहिले म्हणून मी आज त्यांच्यासोबत आलो, असे आनंदाराज आंबेडकर यांनी सांगितले.



    शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची युती जुनी आहे. ती प्रबोधनकार ठाकरे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून चालत आली. तीच युती आम्ही पुढे नेतो आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    – ठाकरे बंधुंच्या बरोबरच भाजपलाही इशारा

    महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येणार पवार काका – पुतणे एकत्र येणार अशी चर्चा राजकीय हवेत असताना एकनाथ शिंदे आपल्या शिवसेनेची कुणाशी युती करणार, याची चर्चाही महाराष्ट्राच्या राजकीय हवेत नव्हती. तशा बातम्या कुठे आल्या नव्हत्या. मराठी माध्यमांनी फक्त ठाकरे बंधूंच्या युतीवर आणि पवार काका – पुतण्याच्या “डबल गेम” राजकारणावर लक्ष केंद्रित केले होते. ठाकरे बंधूंचे ऐक्य भाजपच्या विरोधात असले तरी प्रत्यक्षात ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राजकीय फटका देतील, अशा अटकळी मराठी माध्यमांनी बांधल्या होत्या. पण मधल्या मध्ये एकनाथ शिंदे सुळकंडी मारून आपल्या शिवसेनेची काही वेगळी राजकीय बेगमी करतील, याचा अंदाज देखील मराठी माध्यमांना आला नव्हता. पण एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्याशी युती करण्याची घोषणा करून सगळ्यांना “पॉलिटिकल सरप्राईज” दिले. त्याचवेळी त्यांनी महायुतीमध्ये भाजपने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून आपल्या शिवसेनेला दाबायचा प्रयत्न केला, तर आपणही काही कमी नाही हे दाखवून दिले.

    ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या भोवती राजकीय जाळे विणून भाजपवर त्यांना “खेळवू” शकतो, तर महायुतीत आपणही भाजपशी “खेळू” शकतो, हे एकनाथ शिंदेंनी सुमडीत कोंबडी कापून दाखवून दिले.

    Eknath shinde shivsena forms alliance with anand raj ambedkar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य

    Raj Thackeray जे बोलले नाहीत, तेच राज ठाकरेंच्या तोंडात घातले; राज ठाकरेंनी टाइम्स सकट मराठी आणि इंग्रजी पत्रकारितेचे वाभाडे काढले!!