विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : Eknath Shinde “मला आता कोणत्याही ‘ऑपरेशन’ची गरज नाही. जे एकदा करायचे होते, ते मी करून दाखवले आहे आणि ते लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. आता तर साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतील,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम दिला. पंढरपूर येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात भगिरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.Eknath Shinde
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ राबवून विरोधकांना खिंडार पाडले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आपला अजेंडा जनसेवेचा आहे. कामाचा धडाका पाहून लोक स्वतःहून सोबत येत आहेत. त्यामुळे आता कुठल्या ऑपरेशनची गरज उरलेली नाही.Eknath Shinde
भालके अन् सावंत यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश
सोलापूरच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले दिवंगत नेते भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके आणि अनिल सावंत यांनी समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. या प्रवेशामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भालके यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघावर दावा अधिक भक्कम केला आहे.
एकनाथ शिंदेंचा जयकुमार गोरेंना टोला
काही दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना उद्देशून “निधीसाठी आमच्याकडेच यावे लागेल,” असे विधान केले होते. त्यावर एकनाथ शिंदेंनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. “पैसे हे जनतेचे असतात आणि ते जनतेसाठीच खर्च झाले पाहिजेत. कोणाच्या वैयक्तिक खिशातले ते पैसे नाहीत. त्यामुळे कुणी कुणाला वाकवण्याची भाषा करू नये,” असा टोला शिंदेंनी लगावला. यावेळी त्यांनी शेरोशायरी आणि अभंगांचा आधार घेत आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली.
शिवसेनेत प्रवेश करताच भगीरथ भालकेंचे जयकुमार गोरेंना आव्हान
शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना थेट आव्हान दिले. “निधी देणारा माणूस आज इथे समोरच स्टेजवर बसला आहे, येऊन बघा,” अशा शब्दांत भालकेंनी जयकुमार गोरेंवर प्रहार केला. या पवित्र्यामुळे पंढरपुरात महायुतीमधील भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“I’ve Performed the Operation Once”: Eknath Shinde Ends ‘Operation Tiger’ Speculation
महत्वाच्या बातम्या
- SSC : SSC चुकीच्या प्रश्नावर पूर्ण गुण देणार; ऑब्जेक्शन मॅनेजमेंट सिस्टम 2026 सुरू
- चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज; आशाताईंच्या स्वरांची सोबत कायम राहील!!
- “आशाताई” – दि लास्ट एम्परर; राज ठाकरेंची भावपूर्ण श्रद्धांजली
- PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले- बंगाल बदलासाठी तयार; TMCच्या भयाच्या राजवटीला हटवणार