विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मोदीजी लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तव्यदक्ष प्रधानमंत्री आहेत. जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात येतात, तेव्हा विकासाच्या नवनव्या वाटा खुल्या होतात. मोदी हात लावतात तिथं सोनं होतं; मोदी है तो मुमकीन है, अशा शब्दांत शिंदे यांनी मोदींच्या कामाचा उल्लेख केला.Eknath Shinde
आगामी निवडणुकांमध्ये विकास आणि लोक कल्याणाचा झेंडा हाती घेतलेली महायुतीच विजयी होईल, विजयी पताका फडकवणार, या बाबत माझ्या मनात शंका नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा अप्रत्यक्षपणे शुभारंभ केला.Eknath Shinde
आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना ते सरकार म्हणजे स्थगिती सरकार होतं असा टोला लगावला. त्या काळात प्रकल्प फाइल्स थांबल्या होत्या, निर्णय पुढे ढकलले जात होते. मात्र, आज केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांचा समन्वय असल्याने विकासाला गती मिळत आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, आठ वर्षांपूर्वी मोदीजींच्या हस्ते या ग्रीनफिल्ड विमानतळाचे भूमिपूजन झाले होते आणि आज त्यांच्या हस्तेच उद्घाटन होत आहे, हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.Eknath Shinde
विकासाच्या उड्डाणाला पंख
एकनाथ शिंदे म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा फक्त एक प्रकल्प नाही, तर नव्या भारताच्या संकल्पाचे प्रतीक आहे. हे विमानतळ महाराष्ट्राच्या आर्थिक, व्यापारी आणि पर्यटन क्षेत्राला नवे पंख देणार आहे. प्रगती आणि विकास हे मोदीजींच्या हाताशी नेहमी असतात. जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते. आज नवी मुंबई हे उदाहरण आहे. मोदीजींच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात अनेक महामार्ग, बंदरे, मेट्रो प्रकल्प, तसेच औद्योगिक कॉरिडॉर यांची गती वाढली आहे. हे विमानतळ या सर्व प्रगतीचा नवा टप्पा ठरणार असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला.
देशातील सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प हे महाराष्ट्रात
मुंबईत एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला केवळ एकच तास लागायला हवा. हे काम केवळ आणि केवळ महायुतीत करू शकते. आपण पाहिले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक विकास प्रकल्प सुरू केले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यांनी अनेक प्रकल्पामध्ये अडथळे टाकले आणि त्याला स्थगिती दिली. त्यामुळेच पुन्हा 2022 मध्ये महायुतीचे सरकार आले. स्थगिती सरकार आपण हटवून टाकले. स्पीडबेकर उखडून टाकले. त्यामुळेच गेल्या तीन वर्षात राज्याचा विकास डबल वेगाने होत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने देशातील सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प हे महाराष्ट्रात उभे राहत असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये हा शब्द आम्ही पाळला
राज्याचा विकास होत असताना दुसरीकडे आपण शेतकऱ्याला देखील वाऱ्यावर सोडलेले नाही. आज आपला बळीराजा शेतकरी संकटात आहे. या पूरग्रस्तांसाठी देखील कालच मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये हा शब्द आम्ही पाळला असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
केंद्र सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार देखील कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिले आहे. शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. शेतकऱ्यांना काय दिले? असा प्रश्न विरोधी पक्षातील काही नेते उपस्थित करतात. मात्र त्यांना ही आकडेवारीच माहीत नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र आपल्या शेतकऱ्यांना आणि बळीराजाला या सर्वांची पूर्ण जाणीव आहे. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राला दिलेल्या निधीच्या तुलनेत पाच पट जास्त मदत नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राला दिली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ही मदत कायमस्वरूप राहील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
Eknath Shinde Praises PM Modi: ‘Wherever He Touches, It Turns to Gold’; Predicts Mahayuti Victory in Upcoming Elections
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!
- Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते
- डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!