• Download App
    Mahayuti Will Have Mumbai Mayor: Eknath Shinde on Balasaheb Thackeray's Centenary Year मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला शिवसेनेचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना - एकनाथ शिंदे

    Eknath Shinde : मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला शिवसेनेचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना – एकनाथ शिंदे

    Eknath Shinde

    विशेष प्र्तिनिधी

    मुंबई : Eknath Shinde मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला पसंती दिली आहे, आम्ही जनमताचा आदर करणार. विरोधकांकडून अफवा पसरवण्यात येत असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे शिंदे म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते, असेही शिंदे म्हणाले.Eknath Shinde

    एकनाथ शिंदे म्हणाले, 2019 साली जनमताचा अनादर करत ठाकरेंनी वेगळी सत्ता स्थापन केली. तसे आम्ही करणार नाही. आम्ही जनमताचा आदर करतो. बाळासाहेबांचा आशीर्वाद, नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढल्या गेल्या. त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी आम्ही महायुतीत लढलो त्या त्या ठिकाणी महायुतीचा महापौर निवडून येणार.Eknath Shinde



    तर ठाण्यात अडीच वर्षांच्या महापौरपदाची चर्चा सुरू असल्याचे चर्चा आहे, यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, या विरोधकांनी पसरवलेल्या अफवा आहेत. आमची लढाई ही सत्ता खुर्चीसाठी नाही, आमची लढाई ही मुंबईच्या विकासासाठी आहे. मुंबईकरांना आम्ही काय देणार आहोत यावर आम्ही लक्ष दिले असल्याचे शिंदे म्हणाले.

    तसेच नवनियुक्त नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे, यावर प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या पक्षाची बैठक घेतली, नव्याने निवडून आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन केले. पुढच्या पाच वर्षात त्यांनी काय काम करायची याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

    गट नेत्यांची निवड लवकरच होणार

    दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे सर्व नगरसेवक हे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. या नगरसेवकांचा महापालिकेतील ‘गट’ तातडीने स्थापन केला जाणार असून याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून गट नेत्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव, अमोल घोले सारख्या तरुण अनुभवी नगरसेवकांचे नाव गटनेत्यांच्या यादीत आल्याचे समजते. गट स्थापन केल्यानंतर नगरसेवक फुटीबाबत निश्चिंत राहता येईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे गट स्थापन करण्याची कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

    Mahayuti Will Have Mumbai Mayor: Eknath Shinde on Balasaheb Thackeray’s Centenary Year

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील 29 मनपांतील महापौर पदाचे आरक्षण ठरवण्यासाठी गुरुवारी सोडत

    Navneet Rana : नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी- बाबा सिद्दिकीसारखीच तुमची हत्या करू, पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

    Devendra Fadnavis : विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे ‘गेटवे ऑफ इंडिया’; राज्याच्या सर्व भागासाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रांत गुंतवणूक येणार- CM देवेंद्र फडणवीस