विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुतीतल्या मित्र पक्षांच्या वाटाघाटी अजून सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एक सोशल मीडिया पोस्ट करून एकनाथ शिंदे यांना थेट विरोधी पक्षनेते पदावर बसविले. पण यातून त्यांनी महायुतीला की महाविकास आघाडीला टोला हाणला??, असा सवाल तयार झाला.
एकनाथ शिंदे जाहीर रित्या मोदी शहा यांनी घेतलेला निर्णय मान्य करतात पण नंतर ते आजारी पडतात हे नेमके काय चालले आहे असा सवाल करून अंजली दमानिया यांनी भाजपच्या नेत्याचा हवाला देऊन एकनाथ शिंदेंना विरोधी पक्षनेते कधी बसवायची तयारी चालवल्याचे त्या पोस्टमध्ये नमूद केले. त्यामुळे सरकारी आपलेच आणि विरोधी पक्षनेताही आपलाच बाकी सगळे साफ!!, ही भाजपची रणनीती असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला.
पण हे सगळे घडत असताना महाविकास आघाडीचे नेते नेमके काय करतील??, याचा खुलासा अंजली दमानिया यांनी केला नाही. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेते पदावर बसविणे इतके सहज आणि सोपे आहे का??, 57 आमदार निवडून आणून एकनाथ शिंदे इतक्या सहजासहजी विरोधी पक्षनेते पदावर जाऊन बसतील का??, त्यातून फक्त महाविकास आघाडी साफ होण्यापलीकडे भाजपला दुसरा कोणता फायदा तरी होईल का??, या संदर्भात देखील त्यांनी कुठले भाष्य केले नाही.
Eknath Shinde Leader of Opposition : anjali damania
महत्वाच्या बातम्या
- Sadabhau Khot सदाभाऊ खोतांचा बाबा आढावांना सवाल- मुस्लिमबहुल भागात महायुतीला कमी मते मिळतात, तिथे EVM मविआसाठीच कसे सेट होते?
- Manoj Jarange : भाजप महायुतीला कौल देऊन जनतेने दाखवली सत्तेची दिशा; पण जरांगेंची सरकारच्या मुंडक्यावर पाय द्यायची भाषा!!
- Haryana government गायी पाळणाऱ्यांना ‘हे’ सरकार देत आहे 30 हजार रुपये
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांवरील हल्ल्याच्या घटनेवर भाजपचा मोठा दावा!