विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Eknath Shinde एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे, लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कोल्हापूरच्या कागल येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा मत पेटीत नंबर पहिला. त्यामुळे दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.Eknath Shinde
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातील दिवंगत अजित पवारांना अभिवादन केले. ते म्हणाले, अशा दुःखात देखील आम्हाला प्रचाराला यावे लागत आहे. या निवडणुका लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या पुढे ढकलता येत नाहीत. आम्ही प्रचार साधेपणाने करतो, कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतो, असे शिंदे म्हणाले.Eknath Shinde
ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, कोल्हापूरच्या मातीला एक वेगळा सुगंध आहे. संजय मंडलिक तुम्ही एकटे नाहीत, ही जनता तुमच्या सोबत आहे. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आली आहेत. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीह आहे आणि या लढाईत नेहमी जनशक्ती जिंकते. सत्तेसाठी एकत्र आला असला तरी जनता ठरवते कोणाला आपले मत द्यायचे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय एकनाथ शिंदे थांबणार
लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय एकनाथ शिंदे थांबणार नाही. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे. लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच 2100 रुपये देणार आहोत, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहे.
तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही पक्षाची पाया रचणारी निवडणूक आहे. मी आज नेहमी सारखे भारण करणार नाही. केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर प्रचाराला आलो आहे, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. नगरपरिषद आणि महानगरपालिका पालिका निवडणुकीत शिवसेना राज्यात दुसऱ्या नंबरचा पक्ष राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 5 आमदार आहेत आणि एक खासदार आहे. संजय मंडलिक गेल्या वेळी थोडक्यात सुटले, पुढच्या वेळी नक्की बरोबर पकडतील असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
Ladki Bahin Yojana: Eknath Shinde Announces Hike to ₹2100 in Kolhapur Rally
महत्वाच्या बातम्या
- दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची गरजच काय??, “हा” पर्याय उपलब्ध असताना!!
- Gautam Adani : अदानींनी यूएस-कोर्टाची नोटीस 15 महिन्यांनंतर स्वीकारली; फसवणुकीच्या प्रकरणात 90 दिवसांत उत्तर द्यावे लागेल
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले??, देवेंद्र फडणवीसांनी उलगडले तपशील!!
- केंद्रीय अर्थसंकल्पातून विकासित भारताकडे दमदार पाऊल, महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती