• Download App
    Eknath Shinde is the future Chief Minister! Surprise at the flashing of banners in Thane; Attempts to clear the argument by erasing the letters

    एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री ! ठाण्यात बॅनर झळकल्याने आश्चर्य; अक्षरे पुसून वाद मिटविण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, भावी मुख्यमंत्री! अशा आशयाचे एक पोस्टर ठाण्यात झळकल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. टीकेची झोड उठताच पोस्टरवरील भावी मुख्यमंत्री, ही अक्षर मिटविण्यात आली. या पोस्टरवरून मात्र नवा वाद उफाळून आला आहे. Eknath Shinde is the future Chief Minister! Surprise at the flashing of banners in Thane; Attempts to clear the argument by erasing the letters

    ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उभारलेल्या या बॅनरने ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. वागळे इस्टेटमध्ये लावलेल्या या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

    प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याला उच्चपदावर पाहण्यासाठी उत्सुक असतो आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी पाहण्याचे स्वप्न अनेक शिवसैनिक पहात आहेत. अतिउत्साही कार्यकर्त्यांनी तसे बॅनर उभरल्याने त्याचे पडसाद आज ठाण्यात उमटले.



    ठाण्यातील वागळे इस्टेट भागात लॉरी असोसिएशनने एक बॅनर लावण्यात आला होता. ज्यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. हा बॅनर लागताच विरोधकांनी टीकेची झोड उठवली व काही वेळातच भावी मुख्यमंत्री हे शब्द खोडण्यात आले व या वादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राम रेपाळे यांनी सदर चूक ही प्रेमापोटी झाल्याचे सांगितले. बॅनर लावणारे विजय यादव यांनी आपण साहेबांच्या प्रेमापोटी हा बॅनर लावला होता व माननीय मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा आपला हेतू नसल्याचे स्पष्ट केले.

    Eknath Shinde is the future Chief Minister! Surprise at the flashing of banners in Thane; Attempts to clear the argument by erasing the letters

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा