• Download App
    Eknath Shinde Instructs His Ministers Not to Comment on Manoj Jarange एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचना- मनोज जरांगेंवर प्रतिक्रिया देऊ नका

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचना- मनोज जरांगेंवर प्रतिक्रिया देऊ नका

    Eknath Shinde

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Eknath Shinde मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला असून, मनोज जरांगे २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. हायकोर्टाने त्यांना मुंबई येण्यापासून मनाई केली असली, तरी ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मात्र सावध भूमिका घेत मौन बाळगल्याचे दिसून येत आहे. त्यातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल माध्यमांसमोर कोणतेही विधान न करू नका, अशी सक्त ताकीद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.Eknath Shinde

    मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली असून, त्यांचा रोख मुख्यत्वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. “एकनाथ शिंदे हे मराठ्यांना आरक्षण द्यायला तयार होते, पण फडणवीस यांनीच यात अडथळे आणले,” असा आरोप जरांगे यांनी केला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.Eknath Shinde



    शिंदेंच्या गुप्त बैठकीत काय झाले?

    मनोज जरांगे सातत्याने फडणवीसांवर टीका करत असताना, एकनाथ शिंदे मात्र मौन राखताना दिसत आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या घेतलेल्या गुप्त बैठकीत त्यांनी आपल्या मंत्र्यांनाही माध्यमांसमोर प्रतिक्रिया देऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत. यासोबतच बोलताना महायुती बाबत समन्वय साधून बोलणे अपेक्षित आहे, अशी चर्चा झाल्याचे समजते. तसेच गणेशोत्सव काळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या व्याख्येनुसार पक्षवाढीसाठी प्रयत्न करा, असे निर्देश एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांना दिलेत.

    शिंदेंच्या मंत्र्याने घेतली जरांगेंची बाजू

    दरम्यान, मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करत असताना, भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला असून, प्रत्युत्तर दिले जात आहे. त्याचवेळी दुसरीकडे, शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई मात्र जरांगे यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांनी म्हटले की, “मराठवाड्याची बोलण्याची शैली तशीच आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वापरलेला चुकीचा शब्द मागे घेतला.” तसेच आपण मराठा समन्वय समितीचा सदस्य आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये मध्यस्ती करण्याची जबाबदारी जर आपल्याला दिली तर ती पार पाडू असा विश्वासही शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.

    Eknath Shinde Instructs His Ministers Not to Comment on Manoj Jarange

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; नागपूर-गोंदिया द्रुतगती मार्गाला मंजुरी, 3 तासांऐवजी दीड तासात होणार प्रवास

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांना भाजपची विनंती- मुंबईतील मोर्चा पुढे ढकला; गणेशोत्सवात विघ्न आणू नये- मुख्यमंत्री फडणवीस

    Radhakrishna Vikhe Patil : शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ; सरकारने जरांगेंची मागणी केली मान्य; विखे पाटलांची माहिती