संमेलनातून परतताना आपण मराठी भाषेचा संवर्धनाचा वसा सोबत घेऊन जाऊया, असंही म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Eknath Shinde येथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.Eknath Shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या ५० पेक्षा अधिक बोलीभाषांनी समृद्ध असलेल्या आणि ‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ अशी वैश्विक भूमिका असलेल्या माय मराठीला मी नमन करतो. याच तालकटोरा स्टेडियमच्या जागेवर १७३७ साली मराठ्यांची छावणी उभी राहिली. महाप्रतापी मराठा सरदारांनी तलवारीच्या बळावर दिल्लीचे तख्त राखले होते. एवढ्या वर्षांनी त्याच ठिकाणी आज मराठी साहित्यिकांची छावणी उभारली असून तलवारीने नाही तर सारस्वतांच्या विचारमंचाने लोकांची मने जिंकली आहेत.
तसेच हे संमेलन म्हणजे साहित्य आणि मराठी भाषेचा महाकुंभ आहे असे म्हंटलं तर वावगे ठरणार नाही. मराठी भाषेतील सर्व प्रवाहांचा हा संगम आहे असेही समजायला हरकत नाही. या संगमात गेले तीन दिवस साहित्यस्नान करून आपण सगळे पवित्र झालो आहोत. महाकुंभातून परत जाताना जसे आपण गंगेचे पाणी सोबत घेऊन जातो तसेच, या संमेलनातून परतताना आपण मराठी भाषेचा संवर्धनाचा वसा सोबत घेऊन जाऊया अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर, मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, बी.डी पाटील, विजय दर्डाजी, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई तांबे, उज्ज्वलाताई मेहेंदळे, प्रकाश पागे, शैलेश पगारिया, माजी संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे, संजय नहार, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य मराठी रसिक आवर्जून उपस्थित होते.
Eknath Shinde expressed his thoughts at the closing ceremony of the All India Marathi Literature Conference
महत्वाच्या बातम्या
- Prime Minister Modi पंतप्रधान मोदींनी भाजपच्या आमदार, खासदारासंह पदाधिकाऱ्यांना दिला मंत्र, म्हणाले…
- महाराष्ट्राच्या राजकारणातले “हलके” आणि “जड”; पण दिल्लीत रेटून जम बसवलेल्या गुजरात्यांपुढे सगळेच शरण!!
- मोदी + पवार गुळपीठावर मराठी साहित्यिकांची आणि संमेलन संयोजकांची तोंडे शिवली; पण त्यांनी शिंदे + गोऱ्हेंवर तोफ डागली!!
- Atishi : आतिशी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड, दिल्ली विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू