नाशिक : अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर रंगलेल्या राजकारणाचे वर्णन करताना काही मराठी माध्यमांनी एकनाथ शिंदे हे “अजितदादांची जागा” घेत असल्याची मखलाशी चालविली आहे, पण मूळात काँग्रेसी विचारांच्या पक्षांची political space कमी होत चालली आहे याकडे मात्र त्यांचे लक्ष नाही.Eknath Shinde doesn’t need Ajit Pawar’s political space to expand his shivsena
त्यामुळेच एकनाथ शिंदे काय “अजितदादांची जागा” घेणार??, किंबहुना एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला “अजितदादांची जागा” घेण्याची गरज तरी आहे का??, हा खरा सवाल आहे आणि त्याचे उत्तर अर्थातच नकारार्थी आहे. आणि अगदी अजितदादा तरी ते हयात असताना अशी किती political space व्यापून होते, की ज्यामुळे एकनाथ शिंदे यांना अजितदादांची political space घ्यावीशी वाटेल??, हा खरं म्हणजे वास्तववादी सवाल आहे.
– अजितदादांची ताकद मर्यादित
अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर त्यांच्या राजकीय ताकदीचे आकलन मराठी माध्यमे फारच फुगवून करत आहेत, असे दिसून येते. अजितदादांची स्वतःची राजकीय ताकद होती हे खरेच, म्हणून तर त्यांनी काकांविरुद्ध खरे किंवा खोटे बंड करून महायुतीच्या सत्तेमध्ये शिरकाव करून घेतला होता. महायुतीच्या ताकदीच्या बळावर त्यांनी विधानसभेत 40 आमदार सुद्धा निवडून आणले होते. पण महाराष्ट्राचे राजकीय वास्तव नीट आकलन करून घेतले, तर अजित पवारांनी निवडून आणलेले 40 आमदार हे केवळ त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर निवडून आणले होते, असे मानणे चुकीचे ठरेल. किंबहुना महायुतीच्या बेरजेच्या राजकारणात अजित पवारांचे 40 आमदार निवडून आले होते, हेच वास्तव स्वीकारावे लागेल.
– महापालिका निवडणुकीत अजितदादांचा पराभव
पण त्या पलीकडे जाऊन अजित पवार जेव्हा हयात होते, तेव्हा नजीकची निवडणूक म्हणून महापालिकेची निवडणूक पार पडली होती. त्यावेळी तर सर्वच पक्षांना स्वबळ आजमावायची संधी सुद्धा मिळाली होती. अजित पवारांनी सुद्धा ती संधी घेतली होती, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकांमध्ये सुद्धा अजित पवारांना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या शरद पवारांना “स्वबळावर” सत्ता मिळवता आली नव्हती. उलट अजित पवारांनी “स्वबळाची” ताकद अजमावताना जेव्हा भाजप सारख्या बलाढ्य पक्षाला आव्हान दिले होते, त्यावेळी भाजपच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनी म्हणजेच मुरलीधर मोहोळ आणि महेश लांडगे यांनी अजित दादांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकत्रित बळाला आस्मान दाखविले होते.
– जिल्हा परिषदेत तरी चमक किती??
अजितदादा हयात असतानाच जिल्हा परिषदेची निवडणूक होत होती. त्या निवडणुकीत सुद्धा अजितदादांनी स्वबळच आजमावले होते. तिथे सुद्धा त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मिळाली होती. पण जिल्हा परिषद निवडणूक ऐन मध्यावर असतानाच अजितदादांची अकाली एक्झिट झाली. त्यामुळे ही निवडणूक मूळातच low key झाली. पण या निवडणुकीत सुद्धा पुणे जिल्हा परिषद वगळता इतर जिल्हा परिषदांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावी एवढी चमक दाखवता आली नाही. उलट भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादीच्या एकत्रित ताकदीच्या पेक्षा सुद्धा पुढे निघून गेले.
– पोरके झालेले नेते शिंदेसेनेशी लावतायत पाट
त्यामुळे महाराष्ट्राचे वास्तव हेच की काँग्रेस ही विचारसरणीच्या पक्षांची political space मूळातच कमी झाली आहे. त्याची कारणे वेगवेगळी असली, तरी वास्तव बदलत नाही. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वबळावर शिवसेना चालवणाऱ्या नेत्याला अजित पवारांची “राजकीय जागा” घेण्याची खरं म्हणजे गरज नाही. उलट अजितदादांच्या अकाली एक्झिट मुळे राजकीय दृष्ट्या पोरके झालेले नेते भाजप पेक्षा एकनाथ शिंदेंना जवळ करतायेत. कारण भाजपच्या कडक शिस्तीपेक्षा एकनाथ शिंदेंची शिवसेनेची शिस्त बरी, असे मोहिते पाटलांना आणि अन्य पाटलांना वाटते म्हणून मोहिते पाटील आणि अन्य पाटील लोक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पाट लावू पाहत आहेत. त्या पलीकडे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला अजित पवारांची “राजकीय जागा” घेण्याची बिलकुल गरज नाही.
– एकनाथ शिंदे मोठे नेते
कारण एकनाथ शिंदे एकतर अजितदादांच्या पेक्षा वयाने लहान असले तरी राजकीय दृष्ट्या मोठे नेते आहेत. त्यांचा शिवसेना नावाचा पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी पेक्षा मोठा पक्ष आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित ताकदीपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद महाराष्ट्रात मोठी आहे. अजित पवारांना कधीच मुख्यमंत्री होता आले नाही. त्याउलट एकनाथ शिंदे अडीच वर्षे का होईना, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आता “अजितदादांची जागा” घेताहेत असे म्हणणे हे एकनाथ शिंदे यांची political value कमी करण्यासारखे आहे. पण एकनाथ शिंदे यांची political value एवढी निश्चितच कमी नाही. एकनाथ शिंदे यांना शिवसेना वाढवायची तर ते वेगवेगळ्या मार्गांनी वाढवू शकतात त्यासाठी त्यांना “अजितदादांची जागा” घ्यायची गरज नाही कारण अजितदादांची राजकीय जागा तेवढी मोठीच नाही.
Eknath Shinde doesn’t need Ajit Pawar’s political space to expand his shivsena
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांचे गुणवर्णन करताना मुख्यमंत्र्यांना महाकवी भास आणि कवी पी. सावळाराम यांच्या काव्याची आठवण
- Kishtwar : किश्तवाडमध्ये 2 जैश दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांनी अतिरेक्यांचे तळ उडवले
- MSRTC : राज्य परिवहन मंडळाची घोषणा- आता ‘गाव तिथे एसटी’ नव्हे, ‘आदिवासी पाडा तिथे एसटी’
- राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिशंकर अय्यर यांचा दुसरा खोडा; INDI आघाडीचे नेतृत्व दुसऱ्या नेत्याकडे सोपवायची केली मागणी