प्रतिनिधी
नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर काँग्रेस सह विरोधकांनी बहिष्कार घातला आहे हा त्यांचा विघ्नसंतोषी पणा आहे. पण मराठीत एक म्हण आहे नावडतीचं मीठ अळणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कुठल्याही विकास कामाला विरोधक विरोधच करतात पण आता त्यांना जनता जमालगोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना हाणला आहे. Eknath shinde criticized opposition parties over boycott of inauguration of new parliament
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारच्या नीती आयोग बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज म्हणजेच शनिवार २७ मे रोजी सकाळी मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहून राज्याचे मुद्दे या बैठकीत मांडले आहेत. या बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
नीती आयोगाच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
विघ्नसंतोषी लोक नव्या संसद भवनाच्या लोकार्पणाला विरोध करत आहेत. विरोध करणाऱ्यांना जनता जमालगोटा देऊन धडा शिकवेल. काही लोक विघ्नसंतोषी असतात. अशा कार्यक्रमाला विरोध करणं हा लोकशाहीचा अपमान आहे. त्यांचा विरोध लोकशाहीला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते त्यांनी सांगावं. त्यांना ही जी काही पोटदुखी सुटलीय…. जनता सुज्ञ आहे, त्यामुळे जनता त्यांच्या पोटदुखीला चांगला जमाल गोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल.
पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठीत एक म्हण आहे, नावडतीचं मीठही अळणी लागतं, तशी यांची गत आहे. मोदी साहेबांनी कुठलंही चांगलं काम केलं की त्याला विरोध करायचा असा प्रकार सुरू आहे.
Eknath shinde criticized opposition parties over boycott of inauguration of new parliament
महत्वाच्या बातम्या
- नवीन संसद भवनात ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ची झलक; महाराष्ट्रातून सागवान, राजस्थानचे संगमरवर तर उत्तर प्रदेशातून कार्पेट!
- समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर दुसऱ्या टप्प्याचे शिंदे – फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
- मोदी सरकारची 9 वर्षे : काँग्रेसचे 9 प्रश्न; सरकारचे 9 निर्णय!!
- सावरकर जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातली खोली सामान्यांसाठी खुली..