प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांच्या बरोबर तब्बल 46 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माझ्यासोबतचे आमदार हे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असून, हीच खरी शिवसेना असल्याचे एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेवर आता त्यांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी आता थेट शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शिवसेना ही आमचीच असल्याचे आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्याची चर्चा आहे. Eknath shinde appointed bharat gogawale as chief whip of Shivsena
शिंदेंनी केली प्रतोदाची नियुक्ती
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेतील बंडखोर आमदारांना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभु यांनी बुधवारी एक पत्र पाठवून पक्षाच्या सभेला उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी थेट भरत गोगावले यांची शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी एक ट्वीट करत याबबातची माहिती दिली आहे. त्यांच्या या मोठ्या निर्णयामुळे आता एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचे म्हटले जात आहे.
– एकनाथ शिंदे यांचे ट्विट
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश हे कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच गोगावले यांची नियुक्ती झाल्याचे पत्रही त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवले आहे
Eknath shinde appointed bharat gogawale as chief whip of Shivsena
महत्वाच्या बातम्या
- 1992 – 2022 : पवारांच्या भरवशावर 25 वर्षे चालणारे सरकार 2.5 वर्षात धोक्यात!!; शिवसेनेच्या 29 आमदारांचे बंड!!
- भाजप संसदीय मंडळाची आज बैठक : पक्ष राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडण्याची शक्यता, निवडणुकीसाठी 14 सदस्यांची टीम तयार
- ठाकरे – पवार सरकार धोक्यात : एकनाथ शिंदेंचे 13 आमदारांसह बंड!!; सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम!!