नाशिक : एकीकडे एकनाथ शिंदेंची राजी – नाराजी, तर दुसरीकडे भाजपची हिंदू ऐक्याच्या नव्या राजकारणाची पायाभरणी!!, असे महाराष्ट्राचे राजकारण समांतर रुळावरून गेल्या काही दिवसांमध्ये गेले. Eknath Shinde agreement BJP is laying the foundation for a new politics of Hindu unity
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातल्या आपल्या मूळ दरे गावी निघून गेले. त्यामुळे शिंदेंच्या राजी – नाराजीच्या बातम्या सगळीकडे पसरल्या. त्यातच ते तिथे आजारी पडले. त्यातून शिंदेंच्या शिवसेनेतून वेगवेगळ्या मंत्रालयांच्या मागण्या झाल्याच्या बातम्या पसरल्या. त्यांच्या पक्षाकडून अनेक प्रवक्त्यांनी वेगवेगळी वक्तव्ये केल्याने शिंदेंच्या राजी – नाराजीचे “पर्सेप्शन” संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. यात प्रत्यक्षात कुठला निर्णय झाला नाहीच, त्याचबरोबर अधिकृतपणे कुठल्या गोष्टीचा इन्कार देखील झाला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या बातम्यांनी सगळी माध्यमे व्यापली. शिंदेंच्या सर्व प्रकारच्या बातम्यांनी महाविकास आघाडीच्या बातम्यांची “पॉलिटिकल स्पेस”ही खाल्ली.
पण या सगळ्या कालावधीत भाजपने मात्र शांतपणे शपथविधीची तयारी चालवली होती. आझाद मैदान निवडण्यापासून ते शपथविधीला नेमके कोणाला निमंत्रित करायचे, त्याची संख्या किती निश्चित करायची, यासंदर्भातले बारकाईने नियोजन भाजपच्या नेत्यांनी करून घेतले. गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये एकनाथ शिंदे केंद्रित झालेली माध्यमे त्याकडे दुर्लक्ष करून बसली. त्याचा फायदा भाजपच्या नियोजनकर्त्यांना झाला.भाजपला स्वतंत्रपणे हिंदू एकजुटीची थीम ठरवता आली.
Eknath Shinde : आपटवीरांची मांदियाळी, शिंदेंच्या पाठीशी उभी राहिली!!
– मतदानाचा वाढलेला हिंदू टक्का
“बटेंगे तो कटेंगे”, “एक है तो सेफ है” या या दोन घोषणांच्या आधारे भाजप महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकली. त्याचेच प्रतिबिंब शपथविधीत पडले पाहिजे. यातून महाराष्ट्राचे संपूर्ण चित्र भाजपने बदलल्याचे दिसले पाहिजे, याचे काटेकोर नियोजन भाजपच्या नेत्यांनी केले. महाराष्ट्रामध्ये मतदारांना घराबाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन देऊन मतदान घडवून आणणाऱ्या प्रत्येक घटकाला भाजपने महत्त्व दिले त्यांना शपथविधीला निमंत्रण देण्याचे कौशल्य दाखविले. मतदानाचा टक्का वाढल्यानेच भाजपचा विजय झाला. तो वाढलेला टक्का हिंदू मतदारांचा होता, याकडे भाजपने व्यवस्थित लक्ष पुरविले.
पण या सगळ्यात एकनाथ शिंदेंचे शिवसेनेचे नेते किंवा अजितदादांचे राष्ट्रवादीचे नेते फारसे कुठे दिसलेच नाहीत. कारण त्यांना त्या नियोजनात एकतर इंटरेस्ट नव्हता किंवा स्वतःच्या पक्षाला मिळणारी मंत्री पदे आणि त्यांचे खातेवाटप यामध्येच त्यांना अतिरिक्त इंटरेस्ट होता. त्यामुळे अजितदादांचे दोन दिल्ली दौरे झाले आणि एकनाथ शिंदेंचा सातारा दौरा झाला, पण या काळात भाजपचे नेते शांतपणे शपथविधीचे नियोजन करत बसले होते.
– हिंदू ऐक्य राजकारणाची पायाभरणी
भाजपच्या नियोजनातूनच लाडक्या बहिणी + विविध संप्रदायांचे साधुसंत + वारकरी संप्रदायाचे आचार्य + शेतकरी वर्ग + सजग रहो आंदोलनातले कार्यकर्ते यांचा समुच्चय व्यवस्थित जमवता आला. या सगळ्यांना निमंत्रणे गेली. शपथविधी सोहळ्यातून कोणत्याही परिस्थितीत हिंदू ऐक्याचा संदेश देशभर किंबहुना जगभर गेला पाहिजे, याचे काटेकोर नियोजन करता आले. एक है तो सेफ है असे टी-शर्ट घातलेले दहा हजार तरुण तरुणी शपथविधी सोहळ्यात सहभागी होतील.
भाजपच्या पुढच्या राजकारणाच्या पायाभरणीच्या दृष्टीने हे सात – आठ दिवस त्या अर्थाने फार महत्त्वाचे ठरले. सगळी माध्यमे एकनाथ शिंदेंच्या राजी – नाराजीच्या बातम्या करण्यात मश्गुल राहिली, त्याच कालावधीत भाजपच्या नेत्यांनी आपल्याला जे साध्य करायचे, ते साध्य करून घेतले. मात्र त्याकडे माध्यमांचे दुर्लक्ष झाले.
Eknath Shinde agreement BJP is laying the foundation for a new politics of Hindu unity
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : आपटवीरांची मांदियाळी, शिंदेंच्या पाठीशी उभी राहिली!!
- IPS officer : पहिल्याच पोस्टिंगवर जाणाऱ्या IPS अधिकाऱ्याचा रस्ता अपघातात मृत्यू
- Australian : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी विराट कोहलीबाबत केला मोठा खुलासा, म्हणाले…
- Vijay Rupani and Nirmala Sitharaman : भाजपने विधिमंडळाचा नेता निवडीसाठी ‘या’ दोन नेत्यांना केले निरीक्षक