• Download App
    ED Takes Custody of Fraud Accused Ashok Kharat in Rs 70 Crore Money Laundering Case ईडीने घेतला खरातचा ताबा; मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशी:नाशिक रोड कारागृहातून बंदोबस्तात मुंबईकडे

    Money Laundering Case : ईडीने घेतला खरातचा ताबा; मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशी:नाशिक रोड कारागृहातून बंदोबस्तात मुंबईकडे

    Money Laundering Case

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Money Laundering Case मुंबई येथील विशेष न्यायालयाने मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) ७० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग (पैशांची बेकायदेशीर उलाढाल) प्रकरणात अशोक खरात याला अटक करण्याची परवानगी दिली. बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांचा आधीच सामना करत असलेल्या खरातला नाशिक जेलमधून प्रॉडक्शन वॉरंटवर विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. नाशिक रोड कारागृहातून मंगळवारी सकाळी १० वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अशोक खरात याचा ताबा घेतला.Money Laundering Case

    पोलिसांनी पाळली गुप्तता

    अशोक खरात याने कथितरीत्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘समता नागरी सहकारी पतसंस्थे’मध्ये पीडितांच्या संमतीशिवाय त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून एकाच दिवसात ६० खाती उघडली होती आणि त्याद्वारे ७० कोटी रुपयांहून अधिकचे व्यवहार केले होते. आता ईडी या सर्व आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास करणार आहे. यामुळे खरातच्या अडचणी वाढल्या आहेत.Money Laundering Case



    नाशिक पोलिसांकडून आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आता ईडीचे पथक खरातला मुंबईतील पीएमएलए न्यायालयात हजर करणार आहे. मनी लॉण्डरिंग, बनावट बँक खाती आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी ईडीने त्याच्यावर स्वतंत्र गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, अटकेची शक्यता लक्षात येताच अशोक खरातने मोठा आर्थिक कट रचला होता. कोपरगाव येथील समता पतसंस्थेमध्ये 65 बनावट खाती उघडून केवळ चार दिवसांत 200 हून अधिक व्यवहार करण्यात आले. या व्यवहारांमधून सुमारे 52 कोटी रुपये काढण्यात आल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि करचुकवेगिरी टाळण्यासाठी बँकिंग व्यवहारातील दोन लाखांच्या मर्यादेची पळवाट वापरण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. या बनावट खात्यांमध्ये काही प्रतिष्ठित कुटुंबीयांसह महसूल आणि आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांच्या नावांचाही वापर झाल्याची माहिती समोर आली आहे.

    तपास यंत्रणांच्या मते, या पैशांच्या आधारे अशोक खरात परदेशात पलायन करण्याच्या तयारीत होता. न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होण्याचा त्याचा डाव असल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. परदेशातील काही संपर्कांच्या मदतीने तो भारताबाहेर जाऊन पोलिसांच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होता, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून अटकेची चाहूल लागताच त्याने आर्थिक व्यवहारांना वेग दिला आणि बनावट खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर रक्कम हलवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

    परदेशात पलायनाच्या कटाबाबत माहिती समोर

    अशोक खरात गेल्या दोन महिन्यांपासून महिला लैंगिक अत्याचारासह विविध गंभीर प्रकरणांमध्ये कारावासात आहे. त्याच्याविरोधात पोलिस, ईडी आणि इतर तपास यंत्रणा समांतर चौकशी करत आहेत. आता ईडीच्या ताब्यानंतर या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉण्डरिंग आणि परदेशात पलायनाच्या कटाबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभरात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

    ED Takes Custody of Fraud Accused Ashok Kharat in Rs 70 Crore Money Laundering Case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Valmik Karad : वाल्मीक कराडची कारागृहात प्रकृती खालावली; आंबेजोगाई येथे हलवण्याची शक्यता

    NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरण; मोबाईल नाही, कागदही नाही.. फक्त स्मरणशक्तीच्या जोरावर मनीषा मांढरेंनी फोडला पेपर; तपास यंत्रणाही चकित

    Maharashtra : राज्यात 25,400 मेगावॅट अणुऊर्जेसाठी पहिल्यांदाच 6.5 लाख कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 उद्योग समूह, एका सरकारी महामंडळाशी करार