वृत्तसंस्था
मुंबई : हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देणाऱ्या अमरावतीच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा सध्या तुरुंगात आहेत. पण म्हणून केंद्रीय तपास संस्थांची भ्रष्टाचाराविरुद्धची मोहीम थांबलेली नाही. यवतमाळ – वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचे ईडीचे समन्स चुकलेले नाही…!! ED Summons: Navneet Rana “Inside”; But Emma Gawli’s ED summons did not go wrong !!
खासदार भावना गवळी यांना ईडीने पुढच्या आठवड्यात चौकशी आणि तपासासाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. आणि त्या गैरहजर राहिल्यास ईडी त्यांना अजामीनपात्र वाॅरंट जारी करू शकते. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील मनी लाॅंड्रींग प्रकरणात चौकशी सुरु आहे. या प्रकरणातच ईडीने भावना गवळी यांना समन्स बजावले आहे.
– 18 कोटींचे मनी लाॅन्ड्रिंग
18 कोटी रुपयांच्या मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी खासदार भावना गवळी यांच्यावर आरोप आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे कंपनीत रुपांतर करुन फायदा मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना याआधीच ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तसेच, ईडीकडून काही कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेकदा समन्स बजावूनही भावना गवळी चौकशीसाठी गैरहजर राहिल्या.
– कोण आहेत भावना गवळी??
भावना गवळी या दिवंगत खासदार पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्या पुडंलिक गवळी यांच्या सर्वात लहान कन्या आहेत. पुंडलिक गवळी यांनी सुरवातीपासूनच आपल्या चारही मुलींना प्रोत्साहन दिले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भावना गवळी यांनी राजकारणात प्रवेश केला. त्या 1999 पासून सलग 5 टर्म वाशिमच्या खासदार आहेत.
ED Summons : Navneet Rana “Inside”; But Emma Gawli’s ED summons did not go wrong !!
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : सभेपेक्षा जास्त चर्चा अटीशर्तींची; 15000 च्या गर्दीची…!!; पण यातले रहस्य काय…??
- हिंदीविरुध्द वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची उडी, बॉलीवुडवर साधला निशाणा
- समाज ठरवेल तोपर्यंतच सरकार राहू शकते, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
- मुंबई पोलीसांनी आपल्या नावावर बनावट एफआयआर केला दाखल, उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
- शेतकरी मेळाव्यांमध्ये अल्ला हू अकबरच्या घोषणा देणारे राकेश टिकैत यांचा भोंगे हटविण्याच्या मागणीला पाठिंबा