• Download App
    अनिल देशमुख प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीचे समन्स, पण...!!। ED summons Maharashtra Chief Secretary Sitaram Kunte in Anil Deshmukh case, but ... !!

    अनिल देशमुख प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीचे समन्स, पण…!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांच्या नियुक्त्या बदल्या या संदर्भातल्या काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सक्तवसुली संचालनालय ईडीने समन्स पाठविले आहे. परंतु 25 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची संबंधित बैठक असल्याने चौकशीसाठी हजर राहता येणार नाही, असे सीताराम कुंटे यांनी कळविले आहे. ED summons Maharashtra Chief Secretary Sitaram Kunte in Anil Deshmukh case, but … !!

    पोलिसांच्या नियुक्त्या आणि बदल्या या संदर्भात सक्तवसुली संचालनालय काही चौकशा करत आहे. अनिल देशमुख यांच्यावर यासंदर्भात आरोप झालेले आहेत. त्याचबरोबर अनिल देशमुख यांचे मनी लॉन्ड्रिंग असे प्रकरण देखील सध्या तपास आणि चौकशीच्या पातळीवर आहे.



    या संदर्भातच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काही प्रश्नांची उत्तरे वेडीला सीताराम कुंटे यांच्याकडून अपेक्षित आहेत. त्यासाठीच त्यांनी ईडीने त्यांना समन्स पाठविले आहे.

    परंतु 25 नोव्हेंबर रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाशी संबंधित बैठकांना हजर राहणे महत्त्वाचे असल्याने आपण ईडीच्या चौकशीला हजर राहू शकत नाही, असे सीताराम कुंटे यांनी कळविले आहे.

    ED summons Maharashtra Chief Secretary Sitaram Kunte in Anil Deshmukh case, but … !!

     

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!