विशेष प्रतिनिधी
मुंबई : पक्षातील बंडाळीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिक जोरकसपणे मैदानात उतरून भाजपविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. त्यांची संपत्ती जप्त होण्याचा सपाटा सुरू आहे.ED raids on 7 entrepreneurs in state; asset forfeiture action; All close associates of Sharad Pawar
ताज्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे माजी कोषाध्यक्ष ईश्वरलाल जैन यांची तब्बल 315. 6 कोटी रुपयांची संपत्ती केंद्रीय यंत्रणांनी जप्त केली. त्या आधी पवारांच्या जवळच्या 6 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे 15 वर्षे खजिनदार असलेले आणि राज्यसभा सदस्य असलेले ईश्वरलाल शंकरलाल जैन आणि त्यांचा मुलगा मनीष जैन यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ईडीने धाडी टाकल्याचे पाहायला मिळालं होतं. या धाडी प्रामुख्याने महाराष्ट्रात जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि गुजरात मधील कच्छ या ठिकाणी टाकण्यात आल्या होत्या.
315 कोटींची चल व अचल संपत्ती जप्त
ईडीच्या वतीने टाकण्यात आलेल्या धाडीला आता एक महिना होत असतानाच आता ईश्वरलाल जैन यांची आर्थिक रसद बंद करण्याचा प्रयत्न ईडीच्या वतीने करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण ईश्वरलाल जैन यांचे तब्बल 315 कोटींची चल आणि आचल संपत्तीने ईडीने जप्त केली आहे.
ईश्वरलाल जैन यांची शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. 15 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष, तसेच राज्यसभेचे माजी खासदार राहिलेले आहेत. मुलगा मनीष जैन माजी आमदार.. राजमल लखीचंद ज्वेलर्सचे प्रमुख. जळगावसह महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही त्यांचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे.
PMLA कायद्यानुसार कारवाई
या संपूर्णप्रकरणी ईडीच्या वतीने पत्रकाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे की, शनिवारी पीएमएलए कायद्यानुसार राजमल लखीचंद ज्वेलर्स, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि गुजरात मधील कच्छ या ठिकाणी असलेल्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे. यामध्ये पवन चक्की, चांदी, हिरे, सोने आणि भारतीय मुद्रा अशी संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
ईडीच्या रडावर आलेले पवारांचे निकटवर्तीय….
वाधवान बिल्डर (एचडीआयएल प्रकरण)
मार्केटींग कंपनीची 88 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्या कार्यालयावर छापे आणि अटक करण्यात आली.
दिवाण बिल्डर (डीएचएफएल प्रकरण)
या प्रकरणात सतरा विविध बँकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप असून यामध्ये अविनाश भोसले आणि वादवान बंधू यांच्या कंपन्यांना पैसा दिल्याचा आरोप आहे. अविनाश भोसले आणि वादवान हे दोघेही शरद पवारांचे निकटवर्ती आहेत.
अनिरुद्ध देशपांडे
एमनोरा टाऊनशिप चे मालक आणि सिटी बँकेचे चेअरमन यांच्यावर ईडीची धाड. आर्थिक गैर व्यवहारातून या धाडी पडल्याची माहिती.
अविनाश भोसले
डीएचएफएल येस बँक लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयची कारवाई. भोसले यांचा एक हेलिकॉप्टरदेखील ताब्यात.
नरेश गोयल
जेट एअरवेज 538 कोटी रुपयांच्या गतीत बँक फसवणुकी प्रकरणी ईडीची कारवाई. नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीविरोधात मनी लॉन्ड्रिंग केस.
राणा कपूर
येस बँकेचे अध्यक्ष असताना राणा कपूर यांनी डीएचएफएल, एचडीआयएल अबिल यासारख्या कंपन्यांना मोठ्या रकमेचे कर्ज दिले आणि त्या बदल्यात लाच घेतली. येस बँकेने तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आणि त्यापैकी वीस हजार कोटी रुपये बुडीत कर्जात बदलले. यासाठी देखील लाच घेतल्याचा आरोप आहे.
ED raids on 7 entrepreneurs in state; asset forfeiture action; All close associates of Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या
- एकीकडे मोदी सरकार इस्रायलच्या पाठीशी; दुसरीकडे मणिशंकर अय्यरसह काँग्रेसी – डावे – समाजवादी खासदार पॅलेस्टिनी दूतावासात!!
- पुण्यातील नवले पुलावर कंटेनरला धडकल्याने ट्रकने घेतला पेट, चार जणांचा होरपळून मृत्यू
- Income Tax Raid : चार दिवसांत १ अब्ज रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त, ९४ कोटी रुपयांची रोकड जप्त
- Rajasthan Election : भाजपाने उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर, ‘या’ सात खासदारांना मिळाले तिकीट!