विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शरद पवारांच्या प्रेरणातून उभा राहिलेला वादग्रस्त लवासा प्रकल्प लिलावात विकत घेणारी कंपनी डार्विन इंडिया प्राइवेट लिमिटेड वर सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने छापे घातले. कंपनीच्या कार्यालयातून 78 लाख रुपयांची रोकड आणि 2 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. या छापेमारीत अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.ED raids Darwin company that bought Pawar’s controversial Lavasa project in auction!!
- सुप्रीम कोर्टाचा अजित पवारांच्या गटाला इशारा, शरद पवारांचा फोटो वापरू नका; अन्यथा ‘घड्याळ’ काढून घेऊ
पुणे जिल्ह्यातील पहिले खासगी हिल स्टेशन म्हणून मुळशी तालुक्यात हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने लवासा सिटी बांधली. याची सर्व कामे पवारांच्या “प्रेरणेतून” झाली. सुरुवातीला सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे त्या प्रकल्पाचे संचालक होते. पण नंतर हा प्रकल्प घ्यायला आला आणि तो अखेरीस लिलावात विक्रीला गेला. दिवाळखोरीत निघालेला लवासा प्रकल्प अजय सिंग यांच्या डार्विन कंपनीने विकत घेतला होता. ED च्या दिल्ली विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आज त्याच कंपनीवर छापे घातले. या कारवाईत 78 लाखांची रोकड आणि 2 लाख रकमेची विदेशी रोकड जप्त करण्यात आली.
कसा आहे लवासा प्रकल्प??
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात लवासा प्रकल्प उभारण्यात आला आहे. 12500 एकर जमिनीवर देशातील पहिला खासगी हिल स्टेशन उभारण्यात आले आहे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून उभारण्यात येणारा हा प्रकल्प अडचणीत आला. त्यानंतर हा प्रकल्प घेण्यासाठी डार्विन कंपनी पुढे आली.
1,814 कोटी रुपयांची बोली
मुंबईतील डार्विन ग्रुपने लवासा घेण्यासाठी 1,814 कोटी रुपयांची बोली लावली. परंतु हा प्रकल्प दिवाळखोरीत गेला असल्यामुळे त्याला एनसीएलटीची (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) मंजुरी हवी होती. एमसीएलटीने मंजुरी दिल्यानंतर डार्विन ग्रुपने हा प्रकल्प जुलै 2023 मध्ये घेतला. या प्रकल्पाचा व्यवहार झाल्यानंतर डार्विन ग्रुप आठ वर्षात 1814 कोटी रुपयांची भरपाई बँक आणि घरे घेणाऱ्यांना देणार आहे. बँकांची 929 कोटी रुपये थकबाकी आहे. तसेच घर खरेदी करणाऱ्या लोकांना 438 कोटी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
डार्विन ग्रुपवर ED ने छापेमारी केल्यानंतर लवासा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. परंतु, डार्विन ग्रुप लवासा प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्या बँकांना आणि घरे घेणाऱ्यांना भरपाई देणार आहे.
ED raids Darwin company that bought Pawar’s controversial Lavasa project in auction!!
महत्वाच्या बातम्या
- पृथ्वीराज चव्हाणांच्या पक्षनिष्ठेला अखेर हायकमांडकडून “न्याय”; काँग्रेसची महाराष्ट्रातील प्रचारसूत्रे बाबांच्या हाती!!
- मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळेचे ASI सर्वेक्षण उद्यापासून सुरू होणार
- निवडणुकीच्या तोंडावर अटकेचा केजरीवालांचा कांगावा, पण त्यांनीच आधी टाळली होती ED ची तब्बल 9 समन्स!!
- दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधी, ईडीचे पथक पोहचले केजरीवालांच्या घरी!