विशेष प्रतिनिधी
नाशिक : Ashok Kharat अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी भोंदू अशोक खरात विरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. यामुळे खरातवर दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे. या गुन्ह्यामुळे भोंदू खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे.Ashok Kharat
भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत. यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोणा केल्याशी संबंधित आहेत. तर इतर 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. त्यात आता ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची भर पडली आहे. ईडीने प्रस्तुत प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर हा गुन्हा (ECIR) दाखल केला आहे. त्यानुसार, पोलिसांनी जमा केलेली सर्व महत्त्वाचे दस्तऐवज ईडीने आपल्या ताब्यात घेतले आहेत. अशोक खरातचे आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले? याचा तपास आता ईडी करत आहे.Ashok Kharat
ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केल्याचीही माहिती आहे. या प्रकरणी अशोक खरातच्या बेहिशोबी मालमत्तांसह त्याच्या बँक खात्यांची माहिती घेतली जात आहे. या तपासानंतर खरातच्या मालमत्तांवर टाच येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आर्थिक व्यवहार, मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार रडारवर
अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह 5 जणांविरोधात शिर्डीत बेकायदा सावकारकी व जमीन व्यवहारात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारासह मालमत्ता खरेदी – विक्रीचे व्यवहारही तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. या प्रकरणी विशेष तपास पथकाने शिर्डी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवकांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. साई संस्थानचा एक माजी विश्वस्तही यासंबंधी चौकशीच्या रडारवर आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, शिर्डीत भोंदू खरातचा मोठा भक्त परिवार होता. त्यामुळे त्याचे सर्वाधिक आर्थिक व्यवहार व मालमत्ता खरेदी – विक्रीचे व्यवहार तेथूनच चालायचे. तो आपल्या अनेक भक्तांच्या मालमत्ता खरेदी – विक्रीत भागीदार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर लगेचच ईडीचा गुन्हा
उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अशोक खरात प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री यासंबंधी म्हणाले होते, अशोक खरात प्रकरणात एसआयटी सखोल चौकशी करत आहे. हा तपास रोजच्या रोज जाहीर करता येणार नाही. पण खरातची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्याच्या सर्व व्यवहारांची चौकशी होईल. ईडीनेही या प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यामुळे त्याची ईडी चौकशीही होईल.
ED Files Money Laundering Case Against ‘Godman’ Ashok Kharat; 13th FIR Filed
महत्वाच्या बातम्या
- “कवडीची किंमत देत नाही” ते “परिपक्वता किती ते माहिती नाही”; शरद पवारांचा पार्थ वर राग कायम!!
- मी तर जामिनावर बाहेर; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल की भाजपच्या आरोपांवरून स्वतःच दिली कबुली??
- Anjali Damania : या, चहा प्या आणि CDR कसा काढला ते पाहा; अंजली दमानियांचे राऊत, अंधारेंना आमंत्रण
- Minister Lodha : जैन समाज हिंदूच, अल्पसंख्याक दर्जा फेकून देण्याची वेळ; मंत्री मंगलप्रभात लोढांचे रोखठोक भाष्य