वृत्तसंस्था
मुंबई : शेतकरी व कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांची २३४ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) जप्त केली आहे. ED has attached immovable properties worth Rs 234 Cr of Vivekanand Shankar Patil
चार वेळा आमदार राहिलेले पाटील हे कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत कर्नाळा स्पोर्ट अकादमी आणि जमीन जुमल्याचा समावेश आहे. त्यांनी कर्नाळा स्पोर्ट अकादमीची स्थापना केली होती.
पनवेल मतदारसंघातून ते तीनदा आमदार म्हणून निवडून आले. पनवेलचे विभाजन पनवेल आणि उरण असे झाल्यानंतर ते उरण येथून आमदार बनले. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांनी त्यांचा ५५ हजार ३२० मतांनी पराभव केला. त्यानंतर प्रशांत ठाकूर यांच्याविरुद्ध त्यांनी सार्वजनिक जनहित याचिका दाखल करण्याची धमकी दिली होती.
मनी लॉड्रींग प्रकरणात त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने १५ जून २०२१ रोजी अटकही केली होती. आता गैरव्यवहार प्रकरणी त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ED has attached immovable properties worth Rs 234 Cr of Vivekanand Shankar Patil
विशेष प्रतिनिधी
- मोदीजी, अफगाणिस्तानातील गरीब, महिला आणि मुलांना वाचवा; सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या नातीचा टाहो
- पाकच्या लाहोरमधील महाराज रणजित सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना; शिखांमध्ये संतापाची लाट
- अफगाणिस्तानाचे परागंदा अध्यक्ष अश्रफ घनी यांना कोणता देश आश्रय देणार? साऱ्या जगाचे लागले लक्ष
- तालिबानवरून अमेरिकेत सुरु झाले राजकारण, डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांना घेतले फैलावर