• Download App
    ED ANIL DESHMUKH: अनिल देशमुखांच्या वसुली प्रकरणात ईडीने नोंदवला पुण्याच्या डीसीपींचा जबाब ...|ED ANIL DESHMUKH: In the case of recovery of Anil Deshmukh, ED reported the reply of Pune DCP

    ED ANIL DESHMUKH: अनिल देशमुखांच्या वसुली प्रकरणात ईडीने नोंदवला पुण्याच्या डीसीपींचा जबाब …

    • याच प्रकरणात ईडीने आयपीएस अधिकारी जी श्रीधर यांना देखील समन्स बजावलं आहे.
    • अकोला या ठिकाणी ते पोलीस अधीक्षक म्हणून काम करतात.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: अनिल देशमुखांच्या 100 कोटी वसुली प्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी सुरू आहे.या वसुली प्रकरणात डीसीपी राहुल श्रीरामे यांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. राहुल श्रीरामे हे पुणे वाहतूक विभागाचे डीसीपी म्हणून काम करतात. त्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. त्यांचा जबाब आता नोंदवण्यात आला आहे.ED ANIL DESHMUKH: In the case of recovery of Anil Deshmukh, ED reported the reply of Pune DCP

    अनिल देशमुख यांच्याविरोधात बदल्यांमध्ये फेरफार आणि ढवळाढवळ यासंबंधीचाही गुन्हा आहे. या प्रकरणात श्रीरामे यांची चौकशी करण्यात आली. येत्या काळात आणखी काही डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाऊ शकते.



    7 डिसेंबरला महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे हेदेखील ईडीसमोर हजर झाले होते.30 नोव्हेंबरला ते महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव या पदावरून ते निवृत्त झाले.

    त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी ईडीने या प्रकरणी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांचाही जबाब नोंदवला होता.

    तसंच डेप्युटी आरटीओ बजरंग खरमाटे आणि उपसचिव कैलास गायकवाड यांचीही चौकशी केली होती. त्यांचेही जबाबही या प्रकरणी नोंदवण्यात आले.

    ED ANIL DESHMUKH: In the case of recovery of Anil Deshmukh, ED reported the reply of Pune DCP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??