विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी मधल्या घोटाळेबाज नेत्यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे एकापाठोपाठ एक दणके सुरूच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची 6.50 कोटी रूपयांची लोकांची प्रॉपर्टी अटॅच केल्यानंतर आता ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची 11.36 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ED Action: Shiv Sena’s second blow to ED; MLA Pratap Sarnaik’s assets worth Rs 11.36 crore seized
गेल्या दोन आठवड्यातील शिवसेनेला हा दुसरा दणका बसल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनएसीएल घोटाळयाप्रकरणी ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 36 लाख रूपयांची संपत्ती जप्त केली आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध घोटाळ्यांचा 3 प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
- 1. एमएमआरडीए (MMRDA) टॉप सिक्युरीटी घोटाळा
- 2. एनएसईएल (NSEL) विहंग आस्था टिटवाळा जमीन घोटाळा
- 3. ठाणे विहंग गार्डन 13 मजली 2 अनधिकृत इमारतींचा घोटाळा
येत्या काही दिवसांत घोटाळेबाज तुरुंगात जातील, असे ट्विट कॅरेट सोमय्या यांनी 15 फेब्रुवारी रोजी केले होते. यातल्या एन एसईएल आस्था टिटवाळा जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईकांवर कारवाई करून त्यांची 11.36 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
ED Action : Shiv Sena’s second blow to ED; MLA Pratap Sarnaik’s assets worth Rs 11.36 crore seized
महत्त्वाच्या बातम्या
- रेशन कार्डसोबत आधार लिंक करण्याची अंतिम मुदत आता ३० जूनपर्यंत वाढविली
- आमदारांना मोफत घरे : जनतेच्या संतापानंतर जितेंद्र आव्हाडांनी फिरवले “मोहरे”!!; 70 लाख करणार वसूल!!
- इंधनाच्या कर संकलनात महाराष्ट्र आघाडीवर; जनतेची पिळवणूक; करात सवलत नाहीच
- आमदारांना मोफत घरे : काल विधानसभेत वाजवली बाके; आज जनतेचा संताप पाहून उघडली तोंडे!!