Wednesday, 7 May 2025
  • Download App
    Duty duties! The ideal headmistress of Powai; Sherlyn Udayakumar's initiative; 40 lakhs collected for student fees; Teachers' salaries were also paid

    कर्तव्यमेव कर्तव्यं ! पवईच्या आदर्श मुख्याध्यापिका ; शर्लिन उदयकुमार यांचा पुढाकार ; विद्यार्थ्यांच्या फीसाठी जमवले ४० लाख ; शिक्षकांचा पगारही दिला

    अकर्तव्यं न कर्तव्यं प्राणैः कण्ठगतैरपि । कर्तव्यमेव कर्तव्यं प्राणैः कण्ठगतैरपि ॥


    पवई इंग्लिश शाळेच्या मुख्यध्यापिका शर्लिन उदयकुमार यांनी धडपड करत पैसे जमवून शिक्षण देणे हेच आद्य कर्तव्य असल्याच सांगत इतर शाळांसमोर  एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.  Duty duties! The ideal headmistress of Powai; Sherlyn Udayakumar’s initiative; 40 lakhs collected for student fees; Teachers’ salaries were also paid


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना काळात आतापर्यत आपण फी साठी विद्यार्थ्यांना तगादा लावणाऱ्या शाळांच्या अनेक तक्रारी ऐकल्या आहेत .मात्र, कोरोनाच्या संकटात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना रोजगार नसल्याने फी भरणे शक्य नव्हतं. अशा विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी मुंबईतील एका इंग्रजी शाळेच्या मुख्यध्यापिका धडपड करत आहे. एकही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एका मोहिमेतून ४० लाख जमा करून २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वर्षभराची फी तर भरलीच शिवाय शिक्षकांचा पगारसुद्धा दिला आहे.

    कोरोना संकटात आज जिथं एकमेकांना एकमेकांच्या साथीची गरज असताना एका मुख्याध्यापिकेनं सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या संकटात रोजगार नसल्यानं फी भरणं ज्या विद्यार्थ्यांना शक्य झालं नाही अशा विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी मुंबईतील एका इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेनं स्वत: मेहनत घेऊन लोकांकडे मदतीचं आवाहन करुन तब्बल ४० लाख रुपये जमा केले आहेत.



    वाखाणण्याजोगीबाब म्हणजे या ४० लाख रुपयांतून या मुख्याध्यापिकेनं तब्बल २०० विद्यार्थ्यांची शाळेची फी तर भरली आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच शिक्षकांचे पगार देखील दिले आहेत.

    मुंबईतील पवई येथील पवई इंग्लंड शाळेच्या मुख्याध्यापिका शर्लिन उदयकुमार यांनी ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. शर्लिन यांचं सर्वस्तरातून कौतुक केलं जात आहे.

    ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना रोजगार नसल्याने फी भरणे शक्य नव्हतं. अशा विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी मुंबईतील एका इंग्रजी शाळेच्या मुख्यध्यापिकीने धडपड करत आहे. एकही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एका मोहिमेतून ४० लाख जमा करून २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वर्षभराची फी तर भरलीच शिवाय शिक्षकांचा पगारसुद्धा दिला आहे

    लॉकडाऊनमुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या अनेक पालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आणि आर्थिच चणचण निर्माण झाली. त्यात ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी पालकांची नोकरी गेल्यामुळे फी भरू शकत नाहीत, हे शर्लिन यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शिक्षकांनाही त्यांचा मोबदला मिळावा यासाठी धडपड सुरू केली.

    विद्यार्थ्यांच्या फी चे पैसे जमा करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाद्वारे मोहीम सुरू करत लोकल मॅगजीनमध्ये जाहिरात दिली. काही कंपन्यांशी संपर्क केला. मात्र सुरवातीला कोणाकडूनच पैसे आले नाही. त्यानंतर हळूहळू सीएसआर फंड, सामाजिक संस्था आणि काही दानशूर व्यक्तीकडून मदतीचा ओघ यायला लागला .

    स्थानिक दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संथ्या यांच्याकडून आर्थिक मदत शाळेला मिळू लागली आणि बघताबघता ५ महिन्यात ४० लाख रुपये शर्लिन यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या फी साठी जमवले. यामध्ये फी सोबत शिक्षकांचं मासिक वेतन सुद्धा देण्याचं काम त्यांनी केलं आहे.

    अजूनही मदतीचा ओघ सुरू असून विद्यार्थ्यांचे शिक्षण फी न घेता सुद्धा सुरू आहे. कारण फी चा मुद्दा महत्वचा नसून शिक्षण देणे हेच शिक्षकांचा आणि शाळांचा आद्य कर्तव्य असल्याच शाळेतील शिक्षकांचा म्हणणं आहे. मुख्यध्यापिका शर्लिन उदयकुमार यांच्या या कामामुळे पालकांनी सुद्धा या प्रसंगात साथ दिल्याने मनापासून आभार मानले आहे.

    Duty duties! The ideal headmistress of Powai; Sherlyn Udayakumar’s initiative; 40 lakhs collected for student fees; Teachers’ salaries were also paid

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस