सीएसएमटीवरून थेट ५ वाजून ५६ मिनिटांची टिटवाळा जलद लोकलमध्ये बसले. त्यांनी गार्ड कॅबमधून प्रवास केला.Due to traffic congestion on the roads, Jayant Patil traveled by Mumbai local
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई म्हणजे गर्दी. त्यातली त्यात मुंबईत गाडीने किंवा बसने प्रवास करायचं म्हणल की मग वेळेवर पोहचू हे विसरूनच जावं. कारण सध्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईत वेळेवर पोहचणे हे एक आव्हानच झालय.
या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनाच सहन करावा लागतो. याच कारणामुळे महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट मुंबई लोकलने प्रवासाला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं.
जयंत पाटील यांना डोंबिवलीला जायचं होतं. मात्र, गाडीने प्रवास करताना होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन त्यांनी सीएसएमटीवरून थेट ५ वाजून ५६ मिनिटांची टिटवाळा जलद लोकलमध्ये बसले. त्यांनी गार्ड कॅबमधून प्रवास केला. विशेष म्हणजे याआधी देखील त्यांनी अशाप्रकारे डोंबिवलीपर्यंतचा प्रवास मुंबई लोकलने केला आहे.
Due to traffic congestion on the roads, Jayant Patil traveled by Mumbai local
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबरला गोव्यात; मुक्ती दिनाच्या 60 व्या वर्धापनाचा भव्य कार्यक्रम
- समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती
- मुलींनी प्रजनन क्षमतेच्या वयात लग्न करणे उत्तम ; समाजवादी पार्टी नेते हसन
- एन्जॉय द रेप; काँग्रेस आमदार रमेश यांना प्रियांका गांधी यांनी झापले पण कायदेशीर किंवा पक्षीय कारवाईचे काय??