• Download App
    मुसळधार पावसामुळे राज्यभरातील अनेक धरणांमधून विसर्ग सुरू ; उपमुख्यमंत्री फडणवीस लक्ष ठेवून! Due to heavy rains many dams across the state are releasing Deputy Chief Minister Fadnavis watching

    मुसळधार पावसामुळे राज्यभरातील अनेक धरणांमधून विसर्ग सुरू ; उपमुख्यमंत्री फडणवीस लक्ष ठेवून!

    महाराष्ट्र सरकार सातत्याने कर्नाटक सरकारशी संपर्कात असल्याचेही सांगितले आहे. Due to heavy rains many dams across the state are releasing Deputy Chief Minister Fadnavis watching

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात अनेक भागात मोठा पाऊस सुरू असल्याने काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. याबाबतीत मी सातत्याने सिंचन विभागाशी संपर्कात असून, सिंचन अधिकार्‍यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    खडकवासला धरणातून 35,300 क्युसेक इतका विसर्ग होत होता. तो आता 40,000 क्युसेक इतका विसर्ग होत आहे. उद्या सकाळी पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. याची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेला सातत्याने देण्यात येत आहे.

    तसेच कोयनेतून सध्या 20,000 क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, तो पहाटे 3 वाजता 30,000 क्युसेक इतका होईल. सकाळी 9 वाजता तो 40,000 क्युसेक इतका होण्याची शक्यता आहे. सिंचन विभागात सातत्याने जिल्हाधिकार्‍यांशी संपर्कात आहे.

    याशिवाय महाराष्ट्र सरकार सातत्याने कर्नाटक सरकारशी संपर्कात आहे. कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि अलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता यांच्याशी सातत्याने संवाद होतो आहे. 517.5 मीटर इतकी पाणीपातळी (एफआरएल) कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे आणि ते कर्नाटक सरकारने मान्य केले आहे. अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

    Due to heavy rains many dams across the state are releasing Deputy Chief Minister Fadnavis watching

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!