• Download App
    पाच टक्के जीएसटीमुळे हळद व्यापारी अस्वस्थ; सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेत होते मोठी उलाढाल । Due to five percent GST Turmeric traders upset

    पाच टक्के जीएसटीमुळे हळद व्यापारी अस्वस्थ; सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेत होते मोठी उलाढाल

    वृत्तसंस्था

    सांगली : हळदीवर पाच टक्के जीएसटी लागू झाल्याने व्यापारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हळद हा शेतीमाल असून जीएसटी मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले. Due to five percent GST Turmeric traders upset

    सांगलीतील हळद बाजारपेठ मोठी असून दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल हळद व्यापारात होते. सांगली हळद उद्योगाची प्रमुख नगरी आहे. हळद लागवड, काढणी प्रक्रिया साठवणूक या सर्व सोयी सदर ठिकाणी आहेत. या हळदीची देशात आणि परदेशात निर्यात होते. वर्षाच्या सुरुवातीला या हळद व्यापाराची सुरुवात होते. सेलम, निजामाबाद, देशीकडापा, राजापुरी, कृष्णा, टेकुरपेटा आणि आलेपी इत्यादी हळदीचे प्रमुख प्रकार आहेत. हळदीचे ग्रेडेशन आणि हळद पूड बनवण्याचे अनेक कारखाने सांगलीत आहेत. आंध्र कर्नाटक निजामाबाद म्हैसूर यासह देशातील अनेक ठिकाणची हळद विक्रीसाठी सांगलीत येते. हळद सौदे पद्धतीने एकीकडे थेट विक्री केली जाते. तर आता अलीकडे हळदीचा ऑनलाईन सौदा सुरू झाला आहे. दिवाळीपासून हळदीच्या खरेदी-विक्रीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते.



    हळद वाळवून, पॉलिश करून बाजारात आणली जात असल्याने पाच टक्के जीएसटी लागू असल्याचे दोन दिवसापूर्वी जीएसटी आयुक्तांकडून कळविण्यात आल्याने अडते आणि खरेदीदार यांच्यात खळबळ माजली आहे. तसेच हळद व्यापाऱ्यात अडतदाराकडून घेतल्या जात असलेल्या दलालीवरही पाच टक्के जीएसटी असल्याचे जीएसटी विभागाकडून कळविण्यात आले. सांगलीचे हळद अडते नितीन पाटील यांनी हळदीवर जीएसटी लागू होतो का, अशी विचारणा जीएसटी आयुक्तांकडे फेब्रुवारी २०२० मध्ये केली होती.

    हळदीला पाच टक्के जीएसटी लागू असल्याचे जीएसटी आयुक्तांकडून त्यांना कळविण्यात आले आहे.हळद हा एक तर शेतीमाल आहे आणि शेतकरी कच्चा माल विकत नसतो, हळदीवर प्रक्रिया करूनच ती हळद पुढे विकावी लागले. दुसरा मुद्दा मुळात अडते हे शेतकऱ्यांचा हळदीचा माल घेऊन पुढे व्यापाऱ्यांना देतात. व्यापारी पुढे दुकानदारांना माल देतात. दुकानदार हा माल ग्राहकांना देत असतो. व्यापाऱ्याकडून पुढे हळद विक्री होत असताना त्यावर जीएसटी लावली जाते. पण अडत्यांना जीएसटी लावू नये, अशी प्रमुख मागणी आहे. एक तर अडते हे हळदीची खरेदी किंव्हा विक्री करत नाहीत, ते फक्त कमिशनवर काम करतात, त्यामुळे त्यांच्या पासूनच जीएसटी नको, अशी मागणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्यापाऱ्यांनी जीएसटी भरून आडत्याच्या कडून हळद घेतली तरी ते लगेच हळद विकत नसतात. त्यामुळे अडत्याना पासून जीएसटी सुरू केली तर, व्यापाऱ्यांचे लाखो रुपये अडकून पडणार आहेत. त्यामुळे आडत्याच्या पासून जीएसटी लावू नये,अशी मागणी आहे.

    • पाच टक्के जीएसटीमुळे हळद व्यापारी अस्वस्थ
    • सांगली बाजारपेठेत मोठी उलाढाल होते
    • अडत्यांना जीएसटी लावू नये, अशी प्रमुख मागणी
    • जीएसटी भरून व्यापाऱ्यांकडून हळद विक्री नाही
    • व्यापाऱ्यांचे लाखो रुपये अडकून पडणार

    Due to five percent GST Turmeric traders upset

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!