• Download App
    अजित पवारांवरील छापासत्रामुळे समीर वानखडे यांच्यावर खोटेनाटे आरोप सुरु ; किरीट सोमय्या । Due to action of ED on Ajit Pawar ; False allegations against Wankhade by government Ministers

    अजित पवारांवरील छापासत्रामुळे समीर वानखडे यांच्यावर खोटेनाटे आरोप सुरु ; किरीट सोमय्या

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर गेल्या काही दिवसांपासून छापासत्र सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी हादरले आहेत. या विषयापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी समीर वानखडे यांच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. Due to action of ED on Ajit Pawar ; False allegations against Wankhade by government Ministers

    गेल्या १२ दिवसांपासून समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चिखलफेक सुरू आहे, असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी ठाकरे-पवार सरकारमधील मंत्र्यांवर केला आहे.
    ते म्हणाले, क्रांती रेडकर आणि तिच्या कुटुंबीयांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. समस्त महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी त्यांची माफी देखील मागितली आहे. अजित पवार यांच्या गैरव्य्वहार प्रकरणात आता एडी देखील चौकशी सुरू करणार आहे. सोमवारी लातूर , नांदेड येथील शेतकऱ्यांना घेऊन ईडी कार्यालयात पुरावे सादर करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

    • पवारांवरील छापासत्रामुळे सत्ताधारी हादरले
    • वानखडेंवर आरोप, जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविले
    • नवाब मलिकांकडून वानखडेंवर चिखलफेक सुरु
    • गेले १२ दिवस वानखेडेंच्या धर्मावर खोटी वक्तव्ये
    • वानखेडे आणि कुटुंबीयांवर अकारण चिखलफेक
    • क्रांती रेडकर आणि कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहोत
    • जनतेच्या वतीने मी त्यांची माफी देखील मागितली
    • अजित पवार याची आता एडीकडून चौकशी होणार
    • लातूर , नांदेडच्या शेतकऱ्यांना घेऊन ईडीला पुरावे

    Due to action of ED on Ajit Pawar ; False allegations against Wankhade by government Ministers

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!