विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी, 30 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता केलेल्या कारवाईत तब्बल 2 कोटी 14 लाख 30 हजार रुपये किमतीचा मॅफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून हे दोघेही नाशकातील ड्रग डीलरचे साथीदार असल्याचे उघड झाले. सुभाष जानकी मंडल (29, रा. देहूरोड, पुणे, मूळ राहणार झारखंड) आणि रऊफ रहीम शेख (19, रा. ताडीवाला रस्ता, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.Drugs worth Rs 2.14 crore seized from Sassoon Hospital premises in Pune; Drug trafficking racket busted
नाशिकचा ड्रग्ज डिलर कारागृहातून अंमली पदार्थाचे रॅकेट चालवत होता. ललित अनिल पाटील (34, रा. नाशिक) हा मोठा ड्रग्ज डीलर असून सध्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील एका खटल्याची न्यायालयीन सुनावणीप्रकरणी येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात अडीच वर्षांपासून बंदिस्त आहे. विविध वैद्यकीय कारणे सांगत त्याने यातील निम्मा कालावधी ससून रुग्णालयात उपचारासाठी घालवलेला आहे. आता त्याने कारागृहात ओळख झालेल्या कैद्यांच्या माध्यमातून थेट रुग्णालयातूनच अंमली पदार्थाचे रॅकेट सुरू ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे.
शनिवार, ३० सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुभाष मंडल आणि रऊफ शेख यांना ससून रुग्णालयासमोरील बसस्टॉपवर पावणे दोन किलोग्रॅम मेफेड्रॉन या अंमली पदार्थासह ताब्यात घेतले. रऊफ शेख हा ससून रुग्णालयातील कॅन्टीनचा कर्मचारी आहे. त्यामुळे हे ड्रग्ज त्याने नवीन कपडे असल्याचे सांगत बाहेर आणले असल्याची शक्यता आहे.
Drugs worth Rs 2.14 crore seized from Sassoon Hospital premises in Pune; Drug trafficking racket busted
महत्वाच्या बातम्या
- ”मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार” राज ठाकरेंचं विधान!
- Manipur Violence : मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी चौघांना अटक, दोघे ताब्यात
- देशभरात GST भरण्यात 10.2 % वाढ; 1.63 लाख कोटी जमा; महाराष्ट्र टॉपवर!!
- कावेरी पाणी वादावरून काँग्रेसमध्ये तेढ! आयोगाच्या निर्णयाला विरोध करत असताना,