• Download App
    मुंबईत तब्बल १४०० कोटींचे ड्रग्ज जप्त, अमली पदार्थांचा ७०० किलोचा साठा|Drugs worth 1400 crores seized in Mumbai, 700 kg stock of narcotics

    मुंबईत तब्बल १४०० कोटींचे ड्रग्ज जप्त, अमली पदार्थांचा ७०० किलोचा साठा

    वृत्तसंस्था

    मुंबई : पालघर जिल्ह्यात नालासोपारा भागात मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका कारखान्यावर धाड टाकून मेफेड्रोन(म्यांव म्यांव) अमली पदार्थाचा ७०१.७४० किलो एवढा प्रचंड साठा जप्त केला. त्याची किंमत १४०३ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी जप्त केलेला अमली पदार्थांचा हा सर्वात मोठा साठा आहे.Drugs worth 1400 crores seized in Mumbai, 700 kg stock of narcotics

    गोवंडी येथील एका ड्रग दलालास वरळी पोलिसांनी मार्च महिन्यात अटक केली होती. त्याच्याकडून २५० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. त्याची चौकशी केल्यानंतर या गोरखधंद्यात आणखी काही लोक सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक महिलेसह दोन जणांना अटक केली. त्यांच्याकडून २.७६० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.



    किमान २५ किलो खरेदी करण्याची सक्ती

    अमली पदार्थ विकणारे ठोक विक्रेते त्याच्या संपर्कात होते. एका वेळी किमान २५ किलो मेफेड्रोन त्याच्याकडून खरेदी करावी लागत असे. म्होरक्याची तशी अटच होती. बंदी असलेल्या मेफेड्रोन या अमली पदार्थाला म्यांव म्यांव अथवा एमडी या नावानेही ओळखले जाते.

    अमली पदार्थ बनवण्याचा कारखानाच उघडला

    अमली पदार्थ बनवणारा ५२ वर्षीय म्होरक्या रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेतलेला आहे. अनेकविध प्रयोग केल्यानंतर तो मेफेड्रोन बनवणे शिकला होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याने अमली पदार्थाचा कारखानाच उघडला, असे पोलिसांनी सांगितले.

    Drugs worth 1400 crores seized in Mumbai, 700 kg stock of narcotics

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    अत्याधुनिक संरक्षण आणि एअरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनतेय नागपूर

    सतत नकारात्मक बातम्या येणाऱ्या बीडमधून सकारात्मक बातमी; प्रधानमंत्री आवास योजनेतील 50000 घरे बांधून पूर्ण; बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात साजरी!!

    Uday Samant : उदय सामंतांचा इशारा- आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवू, कोणी जास्त खुमखुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू