• Download App
    ड्रग्ज केस : हा तुमच्या फिल्मचा सेट नाही!, एनसीबी कार्यालयात उशिरा पोहोचणाऱ्या अनन्या पांडेला समीर वानखेडे यांनी फटकारले |Drugs Case Ananya Panday was reprimanded by Sameer Wankhede, reached NCB office late

    ड्रग्ज केस : हा तुमच्या फिल्मचा सेट नाही!, एनसीबी कार्यालयात उशिरा पोहोचणाऱ्या अनन्या पांडेला समीर वानखेडे यांनी फटकारले

    मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या तपासाची व्याप्ती वाढत आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात तुरुंगात आहे. आता अभिनेत्री अनन्या पांडेही ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आली आहे.Drugs Case Ananya Panday was reprimanded by Sameer Wankhede, reached NCB office late


    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या तपासाची व्याप्ती वाढत आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात तुरुंगात आहे. आता अभिनेत्री अनन्या पांडेही ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आली आहे.

    शुक्रवारी याप्रकरणी अनन्या पांडेची दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली, मात्र ती नियोजित वेळेऐवजी तीन तास उशिराने एनसीबी कार्यालयात पोहोचली होती. एनसीबीला तिला उशिरा येणे अजिबात आवडले नाही, यावर अनन्याला फटकारण्यात आले.



    एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अनन्याला उशिरा आल्याबद्दल फटकारले. ते म्हणाले, ‘तुम्हाला 11 वाजता सांगितले होते आणि तुम्ही आता येत आहात. अधिकारी तुमची वाट पाहत बसलेले नाहीत.

    हे तुमचे प्रॉडक्शन हाऊस नाही, हे केंद्रीय एजन्सीचे कार्यालय आहे, तुम्हाला बोलावल्या वेळी आले पाहिजे.मुंबई एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेला दुसऱ्यांदा 11 वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते, परंतु अनन्या 11 वाजेऐवजी 2 वाजेनंतर एनसीबी कार्यालयात पोहोचली.

    ४ तास चौकशी

    एनसीबीने शुक्रवारी अनन्या पांडेची 4 तास चौकशी केली. गुरुवारीदेखील एनसीबीने या प्रकरणात अनन्याची 2 तास चौकशी केली होती. आता अनन्या पांडेला सोमवारी एनसीबीने पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. दोन्ही दिवशी अनन्यासोबत तिचे वडील चंकी पांडे होते. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ड्रग्जप्रकरणी अनन्याची ज्या प्रकारे चौकशी केली जात आहे, त्यानुसार आर्यनच्या अडचणी वाढू शकतात.

    एनसीबीला अनन्या-आर्यनच्या चॅट्सवर संशय

    अनन्या पांडेशी संबंधित तीन चॅट्स सर्वात महत्वाच्या आहेत. 2018 ते 2019 या काळात गांज्याबद्दल या चॅट्स झाल्या. अनन्याचे दोन्ही फोन एनसीबीने जप्त केले आहेत. जेव्हा तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला गेला तेव्हा अनन्या खूप गोंधळलेली दिसत होती. तिने नीट आठवत नाही असे सांगत अनेक प्रश्न टाळले.

    Drugs Case Ananya Panday was reprimanded by Sameer Wankhede, reached NCB office late

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस