विशेष प्रतिनिधी
चांदवड : बकऱ्या चारण्यासाठी गेलल्या दोघे सख्ख्या भावांचा शेततळ्यातील पाण्यात पडून बुडू मृत्यू झाला. चांदवड येथील पाटे गावात त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.Drowning in the water field Death of brothers
चांदवड तालुक्यातील पाटे शिवारातील शेत गट नंबर ७० मधील शेताच्या शेजारी नाल्याच्या लगत बकऱ्या चारण्यासाठी ओम संजय तळेकर (वय १३) आणि साहिल संजय तळेकर वय ( ११) हे गेले होते. त्यांचे मृतदेह बुधवारी ( ता. १७) सायंकाळी तळ्यातून बाहेर काढले.
चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारावकर व पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करून उत्तर तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे मृतदेह आणण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आले.
- शेततळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू
- बकऱ्या चरण्यासाठी गेले असताना घटना
- पाटे गावात पसरली शांतता, हळहळ व्यक्त
- बुधवारी सायंकाळी मृतदेह तळ्यातून काढले
Drowning in the water field Death of brothers