• Download App
    ₹4.26 Crore Cocaine Seized from Rajdhani Express in Nagpur; Woman Arrested राजधानी एक्सप्रेसमधून 4.26 कोटींचे कोकेन जप्त; महिलेला अटक, नागपुरात DRI ची कारवाई

    Nagpur : राजधानी एक्सप्रेसमधून 4.26 कोटींचे कोकेन जप्त; महिलेला अटक, नागपुरात DRI ची कारवाई

    Nagpur

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Nagpur राजधानी एक्सप्रेसमधून चाललेल्या एका मोठ्या ड्रग्ज तस्करीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) पर्दाफाश केला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर केलेल्या या कारवाईत एका महिला प्रवाशाकडून तब्बल ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे ४.२६ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.Nagpur

    ‘डीआरआय’च्या नागपूर प्रादेशिक युनिटला एका महिला प्रवाशाकडून अंमली पदार्थांची खेप नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार, १२ एप्रिल २०२६ रोजी हजरत निजामुद्दीन–केएसआर बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस नागपूर स्थानकावर पोहोचताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. संशयित महिलेची ओळख पटल्यानंतर तिला पुढील चौकशीसाठी अजनी रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले.Nagpur



    तस्करीची अनोखी शक्कल, शॅम्पूच्या बाटलीत कॅप्सूल

    महिलेच्या सामानाची झडती घेतली असता, तिच्या बॅगेत शॅम्पूच्या दोन बाटल्या आढळल्या. या बाटल्यांचे वजन सामान्यपेक्षा जास्त असल्याने अधिकाऱ्यांचा संशय बळावला. बाटल्या उघडल्या असता, त्यातील शॅम्पूच्या द्रावणाखाली ५० पिवळ्या रंगाच्या सीलबंद कॅप्सूल लपवल्याचे दिसून आले. या कॅप्सूल फोडल्या असता त्यात पांढरी पावडर सापडली. अंमली पदार्थ चाचणी कीटद्वारे (Drug Test Kit) तपासणी केली असता, हा पांढरा पदार्थ ‘कोकेन’ असल्याचे स्पष्ट झाले.

    आंतरराज्यीय रॅकेटची शक्यता

    सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी शॅम्पूच्या बाटलीत कॅप्सूल लपवण्याची ही पद्धत अत्यंत चाणाक्षपणे आखण्यात आली होती. मात्र, डीआरआयच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला. प्राथमिक तपासानुसार, ही महिला एका मोठ्या आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा भाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही खेप नक्की कुठून आणली गेली, तिचा मुख्य पुरवठादार कोण आहे आणि हे ड्रग्ज कोणाला पोहोचवले जाणार होते, या दिशेने डीआरआय आता सखोल तपास करत आहे.

    ₹4.26 Crore Cocaine Seized from Rajdhani Express in Nagpur; Woman Arrested

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांनी वारकरी संप्रदायात “घुसलेले” “प्रतिगामी” “शोधले”; पण त्यांना स्वतःच्याच पक्षातले दर्शनाचा काळाबाजार मांडणारे नेते नाही दिसले!!

    Maharashtra : वराह पालनाला आता सरकारी मदत; फडणवीस सरकारची योजनेला मंजुरी, 75 टक्क्यांपर्यंत अनुदान

    राष्ट्रवादीला सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे नुसतेच धुमारे; पण बिहारमध्ये भाजपचे सत्तांतर आणि बंगाल सत्तांतराच्या दिशेने!!