• Download App
    डॉ. माधुरी कानिटकर यांनी स्वीकारला आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार|Dr. Madhuri Kanitkar accepted the post of Vice Chancellor of the University of Health Sciences

    डॉ. माधुरी कानिटकर यांनी स्वीकारला आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार

    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी आज (1 नोव्हेंबर) स्वीकारला. आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाचा मानदंड देऊन लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.Dr. Madhuri Kanitkar accepted the post of Vice Chancellor of the University of Health Sciences


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी आज (1 नोव्हेंबर) स्वीकारला. आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाचा मानदंड देऊन लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.

    विद्यापीठाच्या कामकाजाची दिशा ठरवली जाणार

    याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा कार्यभार स्वीकारताना मला आनंद होत आहे. विद्यापीठ हे शिक्षणाचे केंद्र आहे. यामध्ये विविध विषयांवर संशोधन व उपक्रम होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाचे व्हिजन डॉक्यूमेंट तयार करुन कामकाज करणार आहे. यामुळे अल्प, मध्यम अणि दीर्घ मुदतीत विद्यापीठाच्या एकूणच कामकाजाची दिशा ठरवली जाणार आहे.



    विद्यार्थी घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू

    “माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सक्षमतेने पोहचणे शक्य होणार आहे. आरोग्य शिक्षण क्षेत्रात कोविड-19 च्या काळात आलेल्या अडचणींची पुनरावृती होऊ नये यासाठी व्यापक प्रमाणात बदलाची गरज आहे. यासंदर्भात विषयतज्ज्ञ व त्या-त्या क्षेत्राशी निगडीत लोकांचा सल्ला आाणि मार्गदर्शनाने कार्याची वाटचाल करु” असे कानिटकर त्यांनी सांगितले.

    तसेच संशोधन विद्यापीठाचे प्रमुख ध्येय असून त्या अनुषंगाने विशेष कार्य केले जाणार आहे. अंतर विद्याशाखा संशोधनावर भर दिला जाणार आहे. रुग्णाला पूर्ण बरे करण्यासाठी सर्वसमावेशक उपचार पद्धतीची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने विद्यार्थी घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेदेखील कानिटकर म्हणाल्या.

    Dr. Madhuri Kanitkar accepted the post of Vice Chancellor of the University of Health Sciences

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ