• Download App
    महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका, किरीट सोमय्या यांच्यावरील हल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया|Don't let the issue of democracy continue in Maharashtra, Devendra Fadnavis's angry reaction after the attack on Kirit Somaiya

    महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका, किरीट सोमय्या यांच्यावरील हल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध! अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.Don’t let the issue of democracy continue in Maharashtra, Devendra Fadnavis’s angry reaction after the attack on Kirit Somaiya

    भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. सोमय्या हे पायऱ्यांवर पडल्याने त्यांना दुखापतही झाले. यावर फडणवीस म्हणाले, किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला अतिशय भ्याड आहे. एखादा विरोधात बोलतो म्हणून त्याच्यावर हल्ला करण्याची संस्कृती महाराष्ट्रात कधीच पाहायला मिळाली नाही.



    असे प्रकार पश्चिम बंगालमध्ये सध्या चालतात. बंगालमधली ही तृणमूल संस्कृती महाराष्ट्रात आणली जात आहे, असे पुण्यातील घटनेवरून स्पष्टपणे दिसत आहे. लोकशाही संपवून विरोधकांना आपल्याविरुद्ध काही बोलूच द्यायचे नाही, अशी जी मानसिकता यामागे आहे ती घातक आहे,

    असे नमूद करताना फडणवीस यांनी थेट शब्दांत शिवसेनेला इशारा दिला. विरोधात बोललं म्हणून असे हल्ले होणार असतील आणि पोलीस बघ्याची भूमिका घेणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही.आम्हालाही मग वेगळा विचार करावा लागेल. महाराष्ट्रातील लोकशाही शाबूत राहू द्या. ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करा.

    पुणे महापालिका परिसरात किरीट सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले. सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Don’t let the issue of democracy continue in Maharashtra, Devendra Fadnavis’s angry reaction after the attack on Kirit Somaiya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस